जागर नारीशक्तीचा
Updated On:

पाचवे रूप – स्कंदमाता
आजचा रंग – पिवळा
असुरांना भयभीत करणारे पराक्रमी शिवपुत्र कार्तिकेय म्हणजेच स्कंद. स्कंदाची जननी म्हणजे स्कंदमाता. मातेला शक्तीधर नावानेही संबोधित केले जाते. या देवीला चार हात असून एका हाताने स्कंदबाळाला पोटाशी धरले आहे. एक हात आशीर्वाद मुद्रेत व दोन हातात कमलपुष्पे आहेत. ही धवलवर्णी देवी कमलासनात विराजमान आहे. तिचे वाहन सिंह आहे.
आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी लागणारी संयमशक्ती ती प्रदान करते. मनातील आसुरी वृत्तींचा नाश करून विवेक आणि धैर्य प्रदान करते. तिच्या उपासनेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन मोक्षप्राप्ती होते. वात्सल्यमूर्ती अशा या मातेची वैष्णोदेवी म्हणूनही आराधना केली जाते.
संकलन : लेखिका माधुरी विधाटे




