जगदीप धनखड यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव कसा फेटाळला गेला? ; वाचा काय म्हणाले राज्यसभेचे उपसभापती?

Jagdeep Dhankhad । राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यवर अप्रामाणिकपणाचा आरोप विरोधकांनी त्यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला. मात्र विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाची नोटीस फेटाळण्यात आली आहे. ही नोटीस फेटाळून लावत धनखड यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी घाईघाईने ही तयारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी विरोधकांची ही नोटीस फेटाळून लावत विरोधकांनी आणलेली नोटीस ही वस्तुस्थितीच्या पलीकडेअसल्याचे म्हटले आहे. राज्यसभेचे सरचिटणीस पीसी मोदी यांना सादर केलेल्या आपल्या निर्णयात हरिवंश यांनी, देशाच्या संवैधानिक संस्थांची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी आणि विद्यमान उपराष्ट्रपती धनखड यांची प्रतिमा डागाळण्यासाठी ही नोटीस तयार करण्यात आली होती. धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी विरोधी पक्षांनी कलम 67B अंतर्गत नोटीस दिली होती.
नोटीस फेटाळण्याचे नेमके कारण काय ? Jagdeep Dhankhad ।
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी या नोटिसीत अनेक त्रुटी असल्याचे सांगितले. नोटीस अधिक निष्काळजीपणे काढण्यात आली आहे. त्यात अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत. जसे कि, ज्या व्यक्तीला नोटीस लिहिली गेली आहे त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख नाही, संपूर्ण याचिकेत उपराष्ट्रपतींच्या नावाचे स्पेलिंग देखील चुकीचे आहे, आणि संबंधित कागदपत्रे सोबत जोडलेली नाहीत. तसेच, कोणतीही सत्यता न ठेवता माध्यमांच्या अहवालाच्या आधारे ते तयार करण्यात आले आहे. केवळ उपराष्ट्रपतींची प्रतिमा डागाळण्याच्या उद्देशाने ही नोटीस तयार करण्यात आली आहे, ही चिंताजनक बाब आहे.असे त्यांनी म्हटले आहे.
नोटीस फेटाळून लावताना उपसभापती यांनी, “ही नोटीस योग्य स्वरूपातही नाही. घटनेच्या कलम 90 (C) च्या तरतुदीनुसार कोणताही प्रस्ताव आणण्यापूर्वी 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते. पण संसदेचे कामकाज २० डिसेंबरला संपत आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षनेते आणि इतर खासदारांनी दिलेली नोटीस मान्य नाही. ही नोटीस पूर्णपणे अयोग्य, त्रुटींनी भरलेली आहे आणि उपराष्ट्रपतींची प्रतिमा मलिन करण्यासाठी घाईघाईने आणण्यात आली आहे. या कारणास्तव ते नाकारले जाते” असे स्पष्टपणे उपसभापतींनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी किमान १४ दिवस अगोदर सूचना देणे आवश्यक आहे, तर संसदेचे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरला म्हणजेच आज संपत आहे.
धनखड यांच्यावर विरोधक का नाराज? Jagdeep Dhankhad ।
विरोधकांनी जगदीप धनखड यांच्यावर सभागृहात पक्षपाती वर्तनाचा आरोप करण्यात आला होता. या नोटिसीवर विरोधी पक्षातील 60 खासदारांच्या सह्या आहेत. याप्रकरणी काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले होते की, आम्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांचा अपमान करण्यासाठी आवाज उठवला आहे. आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार), झारखंड मुक्ती मोर्चा, द्रमुक या विरोधी पक्षांच्या खासदारांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे, असेही जयराम रमेश यांनी सांगितले.
काँग्रेसचे राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांनी “सरकारला सभागृहाचे कामकाज चालवायचे नाही”, असा दावा केला होता. जयराम रमेश यांनी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांना चौकटीत उभे केले आणि रिजिजू यांनी राज्यसभेचे अध्यक्ष आणि जेपी नड्डा यांच्यासमोर राज्यसभेचे कामकाज चालू न देण्याबाबत बोलल्याचा आरोप केला. त्यांनी दावा केला की, फ्लोअर लीडर्सच्या बैठकीत रिजिजू म्हणाले होते की, “तुम्ही (विरोधी पक्ष) लोकसभेत अदानीचा मुद्दा उपस्थित करत राहाल तेव्हा आम्ही (सत्ताधारी पक्ष) राज्यसभेचे कामकाज चालू देणार नाही.”





