Baaghi 4 Teaser : जाळ अन् धुर संगटचं! बागी 4 चा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज; खतरनाक अॅक्शन अवतारात टायगर अन् संजय दत्त

Baaghi 4 Teaser : गेल्या बऱ्याच दिवसांपासून अभिनेता टायगर श्रॅाफच्या बहुप्रतिक्षित बागी ४ सिनेमाचा टीझर कधी रिलीज होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर बागी ४ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये बागीच्या आधीच्या तिन्ही भागांपेक्षा या भागातील अॅक्शन वन लेव्हल अप अशा स्वरुपाची टीझरमधून तरी पाहायला मिळत आहे.
टीझरमध्ये अभिनेता टायगर श्रॅाफ फुल अॅान अॅक्शन मोडमध्ये शत्रूंवर क्रूरपणे हल्ला करताना दिसत आहे. त्याचा हा आक्रमक अवतार थरकाप उडवणारा आहे. १ मिनिट ४९ सेकंदांच्या टीझरमधून केवळ हिंसकपणाने गाठलेला क्रूरता दाखविण्यात आली आहे. या सिनेमात अभिनेता संजय दत्तही विशेष भूमिकेत असून त्याचा आक्रमकपणा अंगावर आणणारा आहे.
येत्या ५ सप्टेंबर २०२५ या दिवशी बागी ४ थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ए. हर्षा यांनी केले आहे आणि निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. या टीझरमध्ये रणबीर कपूरच्या अॅनिमल सिनेमात दाखविण्यात आलेले अॅक्शन सीन आणि बागी ४ सिनेमातील अॅक्शन सीनमध्ये काही प्रमाणात साम्य जाणवतं.
View this post on Instagram
हिरोईन के लिए हर हिरो को व्हिलन बननाही पडता है! असा टीझरच्या शेवटी एक डॅायलॅाग अभिनेता टायगर श्रॅाफ म्हणताना दिसतो. पण त्याअगोदर जे घडतं ते भयानक आहे, या सिनेमातील पात्रांच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू दिसत आहेत.
हेही वाचा : Mahadevi Elephant : कोल्हापूरकरांच्या प्रयत्नांना मोठं यश; महादेवी परत आणण्यासाठी पहिला ‘आशेचा किरण’





