Kavya Maran Wedding : काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांचं ठरलं! लग्नाची तारीख आली समोर; रजनीकांत यांच्याशी आहे खास नातं
Kavya Maran Wedding : गेल्या अनेक दिवसांपासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, दोघांनीही आपल्या नात्याबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. अशातच थेट त्यांच्या लग्नाची तारीखच समोर आल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Kavya Maran Wedding : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या संगीताची जादू दाखवणारा लोकप्रिय संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, दोघांनीही आपल्या नात्याबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. अशातच थेट त्यांच्या लग्नाची तारीख समोर आल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
ग्रीसमध्ये लग्न, तर तामिळनाडूत रिसेप्शन?
मिळालेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन हे ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी तामिळनाडूमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शन आयोजित केले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.
या लग्नाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनाही निमंत्रण देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, लग्नाची तारीख, रिसेप्शनचे नियोजन, निमंत्रित पाहुणे आणि कार्यक्रमांच्या व्यवस्थेबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. अनिरुद्ध किंवा काव्या यांच्यापैकी कोणीही या वृत्तांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या बातमीबाबत सध्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
२०२५ पासून रंगली डेटिंगची चर्चा
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्या नात्याबाबत २०२५ पासून चर्चा सुरू झाली. दोघे लास वेगासमध्ये एका डिनरदरम्यान एकत्र दिसल्यानंतर या चर्चांना आणखी जोर मिळाला. मात्र, दोघांनीही आपल्या नात्याबाबत जाहीरपणे भाष्य केलेले नाही.
काव्या मारन ही सनरायझर्स हैदराबाद या आयपीएल संघाची मालकीण आहे. तर दुसरीकडे अनिरुद्ध हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार असून त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.
अनिरुद्ध रविचंदरचं रजनीकांत यांच्यासोबत आहे खास नातं
अनिरुद्ध रविचंदर हा चित्रपटसृष्टीशी संबंधित कुटुंबातून आला आहे. त्याचे वडील रवि राघवेंद्र हे अभिनेते आहेत, तर त्याची आई लक्ष्मी या शास्त्रीय नृत्यांगना आहेत. तसेच सुपरस्टार रजनीकांत यांच्याशीही अनिरुद्धचे कौटुंबिक नाते आहे. रजनीकांत यांच्या पत्नी लता या अनिरुद्धच्या मावशी आहेत.
अनिरुद्धने आपल्या संगीताच्या जोरावर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी त्याने संगीत दिले असून, त्याची गाणी प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
काव्या मारनचा ‘जेलर २’शी संबंधित व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, सध्या सर्वत्र रजनीकांत यांच्या जेलर २ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. काव्या मारन ‘जेलर २’ पाहण्यासाठी उपस्थित होती. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Lal Krishna Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल






