ITR Filing 2026 : 2026 मध्ये आयकर रिटर्न (ITR) भरताना कोणता कायदा लागू होणार? जुना की नवा, याबाबत करदात्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, यंदा ITR भरताना जुना आयकर कायदाच लागू राहणार असून कोणतीही घाबरण्याची गरज नाही. यंदाच्या ITR साठी जुनेच नियम लागू – तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत मिळालेल्या उत्पन्नासाठी (FY 2025-26) AY 2026-27 मध्ये ITR भरताना जुना आयकर कायदा 1961 लागू राहील. जरी नवीन आयकर कायदा 2025 हा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार असला, तरी तो पुढील आर्थिक वर्षाच्या (FY 2026-27) उत्पन्नावर लागू होईल. म्हणजेच, ITR फॉर्ममध्ये कोणताही बदल नाही, कर मोजण्याचे नियम तेच राहतील, डिडक्शन आणि सूट (exemptions) पूर्वीप्रमाणेच मिळतील. CBDTने (केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ) देखील AY 2026-27 साठी जुनेच फॉर्म जारी केले आहेत. ‘टॅक्स इयर’ संकल्पना पुढील वर्षापासून – नवीन आयकर कायद्यात ‘फायनान्शियल इयर’ आणि ‘असेसमेंट इयर’ याऐवजी एकच ‘टॅक्स इयर’ ही संकल्पना आणली जाणार आहे. मात्र हा बदल पुढील वर्षापासून लागू होईल. FY 2026-27 पासून लागू होणाऱ्या नवीन कायद्यात काही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. त्याुनसार HRA साठी मेट्रो शहरांची व्याख्या बदलू शकते, पर्क्विझिट्स (Perquisites) मोजण्याचे नियम बदलू शकतात, डिडक्शन आणि सूट घेण्यासाठी अधिक कागदपत्रे आवश्यक पडू शकतात. हेही वाचा – ई-टूव्हीलर बाजारात TVS Motorचे वर्चस्व कायम; मार्चमध्ये 38 हजार नोंदणी, Ola Electric 5व्या क्रमांकावर सध्या काय करावे? तज्ज्ञांच्या मते, सध्या करदात्यांनी विद्यमान नियमांनुसारच ITR भरावा. मात्र व्यवसायिक आणि व्यावसायिकांनी पुढील वर्षासाठी अधिक कागदपत्रे आणि रिपोर्टिंगची तयारी आत्तापासून सुरू करावी. जुनी की नवी करप्रणाली? सध्या नवी करप्रणाली (New Tax Regime) डिफॉल्ट आहे. यात कर दर कमी असले तरी सूट कमी मिळतात. तर जुनी करप्रणाली (Old Tax Regime) मध्ये 80C, HRA, गृहकर्ज व्याज यांसारख्या सवलती मिळतात. पगारदारांनी आपल्या उत्पन्न आणि गुंतवणुकीनुसार योग्य पर्याय निवडावा, व्यवसायिकांना जुनी प्रणाली निवडण्यासाठी वेळेत Form 10-IEA भरावा लागतो. एकूणच, 2026 मधील ITR फाइलिंगसाठी कोणताही मोठा बदल नाही. जुने नियमच लागू राहतील. त्यामुळे घाई-गडबड न करता अचूक माहिती भरा,प्री-फिल्ड डेटा तपासा, वेळेत ITR सादर करा. तसेच, पुढील वर्षासाठी नवीन आयकर कायद्याची तयारी सुरू ठेवणे अधिक योग्य ठरेल. 1 एप्रिलपासून आयटीआर भरण्यास सुरुवात होईल.