दु:खद ! भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या महाराष्ट्रातील जवानाचा कोरोनाने मृत्यू
Updated On:

नवी दिल्ली – भारत – चीन सीमेवर कर्तव्यावर असलेले भारतीय जवान अमोल किरण आदलिंगे (वय 30, मूळ रा. कमलापूर, ता. सांगोला, जिल्हा. सोलापूर) यांना कोरोनाची बाधा झाल्याने काल (बुधवारी) सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सिक्कीममध्ये कर्तव्यावर असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, आणि एक मुलगी असा परिवार आहे. अमोल अदलिंगे हे 2012 साली भारत-तिबेट सीमा पोलीस दलात भरती झाले होते.
मृत अमोल आदलिंगे यांच्या पार्थिवावर सिक्कीममध्येच भारत-तिबेट पोलीस दलाकडून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





