‘जेव्हा मोदी बोलतात तेव्हा त्यांना…’, जॉर्जिया मेलोनींकडून पंतप्रधानांचा उल्लेख, डाव्या विचारसरणीवर निशाणा साधत म्हणाल्या..

Giorgia Meloni | इटलीच्या पंतप्रधान पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या भारतात विशेष लोकप्रिय आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या उल्लेख करत केलेल्या एका वक्तव्याची सध्या चर्चा रंगली आहे. नुकतेच, मेलोनी यांनी अमेरिकेतील कंझर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्सला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी जगभरातील डाव्या विचारसरणीच्या पक्षांवर जोरदार हल्ला चढवला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर डाव्या विचारसरणीचे लोकं घाबरले आहेत. पीएम मोदीचे नाव घेत त्या म्हणाल्या की, उजव्या विचारसरणीचे नेते काहीही बोलले की, त्यांना लोकशाहीसाठी धोका म्हणून संबोधले जाते.
या कॉन्फरन्सला संबोधित करताना मेलोनी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांचे कौतुक केले. ‘डाव्या विचारसरणीचे लोकं घाबरले आहेत आणि ट्रम्प यांच्या विजयामुळे त्यांची चिडचिड आता उन्मादात बदलली आहे. केवळ रुढीवादी जिंकत आहेत म्हणून नाही, तर रुढीवादी जागतिक स्तरावर एकत्र सहकार्य करत असल्यानेच त्यांची अशी स्थिती आहे, असे त्या मेलोनी म्हणाल्या.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, 90च्या दशकात जेव्हा बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेअर यांनी जागतिक डाव्या उदारमतवाद्यांचे नेटवर्क निर्माण केले, त्यावेळी त्यांना राजकारणी म्हटले गेले. आज डोनाल्ड ट्रम्प, मेलोनी, अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा त्यांना लोकशाहीसाठी धोका म्हटले जाते.’ यावेळी बोलताना डाव्यांची भूमिका दुटप्पी असल्याचेही त्या म्हणाल्या.
जॉर्जिया मेलोनी यांनी ट्रम्प यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, आमच्या विरोधकांना आशा आहे की ते ट्रम्प यांना अमेरिका सोडायला भाग पाडतील, पण ट्रम्प यांची ताकदी आणि प्रभाव पाहता, मी खात्रीने सांगू शकते की जे लोक विभाजनाची अपेक्षा करत आहेत, ते सर्व चुकीचे ठरतील.’





