इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींचं अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी केलं अनोखे स्वागत; भर पावसात गुडघ्यावर बसले अन्…

Giorgia Meloni Video | इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सध्या अल्बेनियाच्या दौऱ्यावर आहेत. तिरानामध्ये आयोजित यूरोपियन पॉलिटिकल कम्यूनिटी समिटमध्ये सहभागी होण्यासाठी त्या अल्बेनियामध्ये आहेत. या युरोपियन युनियनच्या शिखर परिषदेदरम्यानचा एक क्षण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
युरोपियन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी अनोख्या पद्धतीने स्वागत केले. अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी भर पावसात रेड कार्पेटवर गुडघ्यावर बसून आणि दोन्ही हात जोडून त्यांचे स्वागत केले. यानंतर दोघांनी गळाभेट घेत फोटोही काढला.
अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी जॉर्जिया मेलोनी यांचे स्वागत केल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. पावसातही त्यांनी केलेल्या स्वागताने मेलोनी भारावून गेल्या होत्या. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी जॉर्जिया मेलोनी यांचं कौतुक केले आहे. जागतिक नेत्यांकडून एवढा आदर सन्मान मिळत असेल तर कौतुकास्पद असल्याचे काहींनी म्हंटले आहे.
Giorgia Meloni truly commands the utmost respect of world leaders. This is quite the sight to see. pic.twitter.com/xBp3d0Qi7j
— Joey Mannarino 🇺🇸 (@JoeyMannarinoUS) May 16, 2025
अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे गुडघे टेकून स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जानेवारीच्या सुरुवातीला अबू धाबी येथे झालेल्या जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषदेदरम्यान, अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे 48व्या वाढदिवसानिमित्त गुडघ्यावर बसून स्वागत केले आणि त्यांना स्कार्फ देखील भेट दिला होता. दरम्यान, मेलोनी यांची लोकप्रियता भारतामध्ये सुद्धा आहे. त्या भारत भेटीवर आल्यानंतर त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.
हेही वाचा :
‘हे सगळं असंच आहे’; कमी मानधन मिळण्याबाबत हुमा कुरेशी स्पष्टचं बोलली





