Italy : पंतप्रधान मेलोनीची खिल्ली उडवणं पत्रकाराला पडले महागात, कोर्टानं दिली मोठी शिक्षा…! जाणून घ्या, काय आहे संपूर्ण प्रकरण

Italy PM Giorgia Meloni : इटलीमध्ये पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची खिल्ली उडवणाऱ्या महिला पत्रकाराला न्यायालयाने दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम पंतप्रधानांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, मिलान कोर्टाने महिला पत्रकाराला जॉर्जिया मेलोनीची (PM Giorgia Meloni) खिल्ली उडवल्याबद्दल 5000 युरो (सुमारे 4.55 लाख रुपये) नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे. याशिवाय महिला पत्रकार गिउलिया कोर्टेस (Giulia Cortese) यांना ऑक्टोबर 2021 मध्ये केलेल्या पोस्टसाठी देखील दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये त्याने मेलोनीच्या उंचीबाबत ट्विट केले होते. या प्रकरणात दंडाची रक्कम 1200 युरो आहे. या ट्विटची व्याख्या ‘बॉडी शेमिंग’ अशी करण्यात आली होती.
पत्रकाराने दिली अशी प्रतिक्रिया…
रोम न्यूज एजन्सी एएनएसए (ANSA) नुसार, दंडाची ही रक्कम पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना दिली जाईल. त्याच वेळी, न्यायालयाच्या या निर्णयानंतर, पत्रकार कोर्टेस यांनी X (ट्विटर) वर लिहिले की, इटली सरकारला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेत मतभेदाची गंभीर समस्या आहे. कोर्टेस म्हणाले की, इटलीतील स्वतंत्र पत्रकारांसाठी ही कठीण वेळ आहे. येणाऱ्या चांगल्या दिवसांची आशा करूया. आम्ही हार मानणार नाही.
2021 पासून सुरू आहे वाद….
2021 मध्ये सोशल मीडियावर मेलोनी आणि कोर्टेस यांच्यात वाद झाले होते. यानंतर जॉर्जियाने पत्रकार कोर्टेसच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती, असा आरोप होता की, कोर्टेसने सोशल मीडियावर मेलोनीचा एक बनावट फोटो शेअर केला होता, ज्याच्या पार्श्वभूमीवर फॅसिस्ट नेता बेनिटो मुसोलिनीचा फोटो होता. मेलोनीने आक्षेप घेतल्यानंतर पत्रकार कोर्टेसने तो फोटो काढून टाकला होता.
मात्र, पुढच्याच पोस्टमध्ये त्याने मेलोनी यांची कमी उंचीवरून खिल्ली उडवली होती. कोर्टेसने पोस्ट केले आणि लिहिले होते की, तुम्ही मला घाबरवू शकत नाही. तुम्ही फक्त 4 फूट उंच आहात, इतक्या लहान की तुम्ही मला दिसूही शकत नाही. इटालियन मीडिया रिपोर्ट्समध्ये पंतप्रधान मेलोनी यांची उंची 5.2 फूट ते 5.3 फूट असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Russia Ukraine War : अमेरिकन एफ-16 फायटर जेट पाडा अन् मिळवा 1.41 कोटींचे बक्षीस….
दंडाची रक्कम मेलोनी करणार दान…
मेलोनीच्या वकिलाने सांगितले की, पंतप्रधान दंडाची रक्कम दान करणार आहेत. त्याच वेळी, कोर्टेसला 90 दिवसांच्या आत शिक्षेविरुद्ध अपील करण्याचा अधिकार आहे.


