मोदी युद्धज्वर निर्माण करतील असे भाकीत करण्यात आले होते – कुमारस्वामी यांचा दावा

निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा दिला हवाला

बंगळूर -पंतप्रधान नरेंद्र मोदी युद्धज्वर निर्माण करतील असे भाकीत 2017 मध्ये एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने केले होते, असा खळबळजनक दावा करून कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी शुक्रवारी वादाला तोंड फोडले.
दोन वर्षांपूर्वी माझी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याशी भेट झाली. मोदी लोकसभा निवडणुकीआधी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाची कथा रचतील. ते मतांसाठी पुन्हा जनतेची दिशाभूल करतील, असे त्यांनी मला सांगितले होते.

आता भाजप देशाच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करून मते मागत आहे. जनतेने त्या पक्षावर विश्‍वास ठेऊ नये. माझे वडील (एच.डी.देवेगौडा) पंतप्रधान असताना बॉम्बस्फोट झाले का? त्यांच्या कार्यकाळात कुठला जवान शहीद झाला का, असे सवालही कुमारस्वामी यांनी एका सभेत बोलताना केले. दरम्यान, कुमारस्वामी यांच्या दाव्यावर भाजपने संतप्त प्रतिक्रिया दिली. कुमारस्वामी यांना पुलवामा कटाची आधीच माहिती होती का? माहिती असूनही ती केंद्र सरकारला दिली नसेल तर कुमारस्वामी यांनी देशद्रोह केला आहे, असा पलटवार भाजपकडून करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.