Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाणे सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. २००८ मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून राज ठाकरेंना निर्दोष मुक्त केले आहे. आंदोलनादरम्यान राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध होईल असे कोणतेही ठोस पुरावे न्यायालयात सादर करता आले नाही. पुराव्याअभावी न्यायालयाने राज ठाकरे यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी मागील अनेक वर्षांपासून सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणात आज राज ठाकरे यांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे. Hiccups: “कोणी आठवण काढतंय” म्हणून उचकी लागते का? जाणून घ्या यामागचं खरं कारण नेमकं काय घडलं होतं? कल्याण, दादर, अंधेरी, डोंबिवली रेल्वे स्थानकांवर 19 ऑक्टोबर 2008 रोजी रेल्वे भरती परीक्षेसाठी मोठ्या संख्येने परप्रांतीय उमेदवार आले होते. यावेळी आलेल्या उत्तर भारतीय मुख्यतः बिहार आणि उत्तर प्रदेशातील शेकडो उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. याबरोबरच मनसैनिकांनी परीक्षा पेपर फाडले होते. तसेच रेल्वे स्थानकावर दगडफेक, तोडफोड करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यात रेल्वेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल होता, मात्र यातील 2 आरोपींचा खटला प्रलंबित असतानाच मृत्यू झाला. राज ठाकरेंवर कोणते आरोप होते? दरम्यान, राज ठाकरे यांनी मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या असल्याचा आरोप करत भडकाऊ भाषण केले, असा आरोप फिर्यादी पक्षाने केला होता. राज ठाकरे यांनी रेल्वे नोकर भरतीत बिहारी तरुणांना प्राधान्य दिल्याचा आरोप करत विरोध केला होता. प्रक्षोभक भाषणाच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी तरुणांची माथी भडकवल्याने हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या भाषणामुळे मनसे कार्यकर्त्यांनी ‘मराठी तरुणांना हक्क मिळावा’ असं म्हणत आंदोलन केलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. हेही वाचा: Hiccups: “कोणी आठवण काढतंय” म्हणून उचकी लागते का? जाणून घ्या यामागचं खरं कारण