US OPEN Prize Money 2024 : जागतिक क्रमवारीत अव्व्ल स्थानी असणाऱ्या इटलीच्या जॅनिक सिनरने चालू वर्षातील दुसऱ्या ग्रॅडस्लॅम विजेतेपदावर आपले शिक्कामोर्तब केले. यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला पराभूत करताना ही कामगिरी केली. ऑस्टेलियन ओपन व यूएस ओपन अशा दोन्ही स्पर्धा एका वर्षात जिंकणारा जिंकणारा तो चौथा खेळाडू ठरला. या विजेतेपदानंतर सिनरवर पैशांचा वर्षाव झाला आहे. त्याला बक्षीस रक्कम म्हणून किती कोटी रुपये मिळाले आहेत, हे जाणून घेऊया…. सिनर झाला मालामाल…. आर्थर अश स्टेडियमवर झालेल्या पुरुष गटाच्या अंतिम फेरीत जॅनिक सिनरने 2 तास 16 मिनिटात अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला 6-3, 6-4, 7-5 असे पराभूत करत विजेतेपद पटकावले. आता जर आपण यूएस ओपनच्या बक्षीस रकमेबद्दल बोललो तर, हे विजेतेपद जिंकल्यानंतर, जॅनिक सिनर (Jannik Sinner) याला 3.6 दशलक्ष डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळाली आहे, जी भारतीय चलनानुसार तब्बल 30 कोटी 23 लाख 18 हजार 023.32 रुपये इतकी आहे. एवढ्या मोठ्या रकमेने कोणीही श्रीमंत होईल. जे सिनरसोबतही घडले आहे. US Open 2024 : इटलीचा सिनर, ‘यूएस ओपन’चा विनर आरिना सबलेन्कालाही मिळाली तेवढीच रक्कम… याआधी, यूएस ओपन 2024 महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणाऱ्या आरिना सबलेन्का हिने 3.6 मिलियन डॉलर इतकी रक्कम जिंकली आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बेलारूसच्या आरिना सबलेन्काने अमेरिकेच्या जेसिका पेगूलाला सरळ सेटमध्ये पराभूत करताना यूएस ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजतेपद पटकावले आहे. महिला एकेरीच्या अंतिम लढतीत आरिना सबलेन्काने 1 तास 53 मिनिटात जेसिका पेगूलाचे आव्हान 7-5, 7-5 असे मोडून काढत विजय साकार केला.