नगर – राजकीय दबावातून गुन्हा दाखल झाल्याचा संशय

नगर – शहराचे माजी महापौर संदीप कोतकर हे केडगाव येथे आल्यावर त्यांची ग्रामस्थांनी भेट घेतल्यावर केडगाव देवीची दर्शन घेऊन ते निवासस्थानी निघून गेले.
पंरतु संग्राम कोतकर यांनी मनात पुर्वग्रह ठेवून कुकारस्थान रचण्याच्या उद्देशाने गुरुवारी (दि. 23) रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात खोटी फिर्याद दिली आहे. संबधीत फिर्याद ही खोटी असून संबधीत प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सचिन कोतकर यांच्यासह शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
संबधीत फिर्याद देणाऱ्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स व रेकॉडींग तपासून त्यांना संपर्क करणारे संशयीत व्यक्ती व राजकीय दबाव टाकणारे यांचा शोध लावण्यास मदत होऊन संबधीत घटनेची सत्यतता तपासण्यास सहकार्य होईल.
फिर्याद देणार हे उपद्रवी व्यक्ती असून विनाकारण खोट्या केसेस, खटले दाखल करण्याची सवय आहे. त्यामुळे खोट्या तक्रारीची योग्य ती शहानिशा करावी, तसेच फिर्यादीचे व त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासून कारवाई करावी, कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालेली फिर्याद रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी विजय कराळे, राहुल कांबळे, गणेश साळुंके, विनोद लगड, गणेश सातपुते, संतोष बारस्कर, आदित्य शिंदे, सागर सातपुते, भुषण गुंड, सिराज शेख, महेश कांबळे, सचिन सातपुते, अमोल सातपुते, संकेत सातपुते, सोमनाथ कराळे, नवनाथ घेबुंड, राजेश सातपुते, प्रशांत कार्ले, अभिजित ठुबे, अशोक कराळे, ऋषिकेश सातपुते, सौरभ कोतकर, अशोक कोतकर यांच्या निवेदनावर सह्या आहेत.





