इंस्टाग्रामवरील डिलीट झालेले फोटो अन् व्हिडीओ रिस्टोअर करणं शक्य; वाचा ‘या’ नव्या फिचरविषयी

Updated On:
इंस्टाग्रामवरील डिलीट झालेले फोटो अन् व्हिडीओ रिस्टोअर करणं शक्य; वाचा ‘या’ नव्या फिचरविषयी

मुंबई : प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram) आपल्या युजर्ससाठी नवे एक खास फिचर घेऊन आले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स आपले काही दिवसांपूर्वी डिलीट केलेले फोटो, व्हिडीओ आणि पोस्ट्स रिस्टोअर करु शकणार आहेत. याची माहिती कंपनीने एका ब्लॉगमार्फत दिली आहे. त्यामुळे याचा फायदा युझर्सला मोठ्या प्रमाणात होणार असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

इंस्टाग्रामचे नवे फिचर Recently Deleted Folder मध्ये काही दिवसांपूर्वीची डिलीट करण्यात आलेले व्हिडीओ-फोटो दिसणार आहेत. या फोल्डरमध्ये इन्स्टाग्राम स्टोरी मात्र केवळ 24 तासांसाठीच दिसेल. परंतु, इतर मीडिया फाईल्स 30 दिवसांपर्यंत याच फोल्डरमध्ये राहतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, युजर्सला आपली स्टोरी केवळ 24 तासांच्या आत रिस्टोअर करु शकतात. त्यानंतर या फोल्डरमधून ही स्टोरी आपोआप डिलीट होईल. एवढंच नाहीतर, या फिचरच्या मदतीने Reels आणि IGTV देखील रिस्टोअर करता येतील.

इन्स्टाग्रामच्या Recently Deleted Folder फिचर यूज करण्यासाठी तुम्हाला अॅप अपडेट करावे लागेल. आता अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन अकाउंटमध्ये जा. त्यानतंर रिसेंटली डिलीटेडचा ऑप्शन सिलेक्ट करा.

दरम्यान, जर तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅकर्सनी हॅक केले, तर हे फिचर फायदेशीर ठरते. हॅकर्सनी तुमचे फोटो-व्हिडीओ इत्यादी डिलीट केले असतील, तर या फिचरमार्फत तुम्हाला रिसेंटली डिलीडेट फिचरमध्ये जाऊन तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडीओ रिस्टोअर करु शकता.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...