व्हायरल क्लीपवरून जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंवर केला गंभीर आरोप; म्हणाले राज ठाकरेंनींच….

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लीप मुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही ऑडिओ क्लिप आपल्या ट्विटरवर पोस्ट केली होती. त्यानंतर, ही क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लीपवरुन जितेंद्र आव्हाड यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरच हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
माझा हा आवाजच नाही तर हे काय तपासायला जाणार आहेत? मी सांगतो हा माझा आवाजच नाही, राज ठाकरे कोणाचाही आवाज काढतात त्यांनीच माझा आवाज काढून क्लिप तयार केली, तुम्हाला माहित आहे ते किती मोठे मिमिक्री आर्टिस्ट आहेत असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आता मनसे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता आहे.
काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?
या ऑडिओ क्लिपमध्ये जितेंद्र आव्हाड हे मल्लिकार्जुन पुजारी नामक व्यक्तीशी संवाद साधताना दिसत आहेत. जाऊ दे, मरु दे तिला, तू कशाला बदनाम होतो? असा संवाद यात पाहायला मिळत आहे. यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण पेटण्याची शक्यता आहे.





