Ajit Pawar News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देखील ‘जनसन्मान’ यात्रा काढण्यात आली आहे. विरोधक महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत महिलांना दर महिना १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेवरून महाविकास आघाडीचे नेते मंडळी सतत टीका करताना दिसून येत आहे. आज अजित पवारांची ‘जनसन्मान’ यात्रा मावळ येथे आहे. यावेळी अजित पवार यांनी जनतेशी संवाद साधला. मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती. लाडकी बहीण पुन्हा एकदा अजित पवारांनी भाष्य केलं होतं. तर, त्याचवेळी त्यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. मावळ येथील जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी म्हटलं आहे की, ‘हात जोडून सांगायचंय की, मुलं बाळ होतात देवाची कृपा अल्लाची कृपा म्हणतात. पण काही देवाचीवगैरे कृपा नसते. नवऱ्याची कृपा असते म्हणून पोर बाळं होतात. कृपा करुन दोन मुलांवरुन थांबा. कृपा करून दोन मुलांवर थांबा. दोन मुलांवर थांबलात तर अधिक योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना शिकवता येईल’, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, ‘मावळमध्ये मागासवर्गीय समाज आहे. लहान कुटुंब ठेवलं तर या योजनांचा आधिक फायदा तुम्ही घेऊ शकता. त्या दोन मुलांना तुम्ही चांगलं शिक्षण देऊ शकाल. चांगल्या पद्धतीने सांभाळ करु शकता. त्याचबरोबर तुम्हीदेखील चांगलं जीवन जगू शकता. आम्ही बाकीच्या बाबतीत ८० कोटी लोकांना भारतात मोफत अन्नधान्य देतो. हे जनसन्मान योजनेच्या माध्यमातून याच महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. याचबरोबर, भाऊ ओवाळणी टाकतो ती परत घेत नसतो. त्यामुळं विरोधक जे सांगत आहेत पैसे परत घेणार आहे. तर असं काहीही होणार नाही. पुणे जिल्ह्यातील महिलांसाठी उद्या पैसे जमा होणार आहेत. ते पैसे तुमचे आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. असं देखील पवार यावेळी म्हणाले. ‘सुनेत्राला बहिणीविरुद्ध उभं करणं मोठी चूक होती’; अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाल्या….