Satara | मेढा माणूस समजण्यासाठी संत वाचणे आवश्यक

मेढा, (प्रतिनिधी) – आधुनिक तंत्रज्ञानाच्या या कलियुगात प्रत्येक माणुस संत झाला तरच माणसातील माणूस जिवंत राहील. यापुढे संतांच्या प्रतिमाचे पुजन फक्त चालणार नाही तर संत समजण्यासाठी आणि होण्यासाठी प्रत्येक संत वाचून आचरणात आणला पाहिजे . तरच या मानवतेचे जीवन सुखी आणि समाधानी होईल, असे प्रतिपादन शिंपी समाजाचे नेते व संत नामदेव महाराज पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन धनंजय खटावकर यांनी व्यक्त केले.
मेढा येथील शिपी समाजाच्या वतीने ६७४ वा संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा विठ्ठल मंदिरामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी अभिषेक, पुजा, भजन दुपारी चार ते सहा या वेळात कीर्तनाचा कार्यक्रम झाला.
मिलन मुळे, संजीवनी मुळे यांना पदोन्नती मिळाल्या बद्दल तर रवींद्र मुळे हे बँकेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल तसेच नेते धनंजय खटावकर यांची सातारा जिल्हा संत नामदेव सहकारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सर्वांचा सन्मान करण्यात आला. अनेक वर्षांपासून मेढ्यातील सर्व शिपी समाज बांधव अविनाश कारंजंकर यांच्या अध्यक्षतेखाली करत आहेत.
यावेळी माजी उपसभापती कांतीबाई देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. विशाल रेळेकर यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक वाईकर, रवींद्र मुळे,
राजेंद्र रेळेकर, धनंजय खटावकर, दीपक महाडिक, विजय वाईकर, उदय कारंजकर, भाऊ खटावकर, हरिभाऊ वाईकर, वैभव रेळेकर, मोहन बाचल, पाटसकर, महेश डंबे, अनिल खटावकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सर्व शिंपी समाज, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.





