पिंपरी – अलिकडच्या काळात उपवर मुला-मुलींच्या आई वडिलांच्या वाढत्या अपेक्षांमुळे उपवर मुलामुलींचे विवाह जुळणे कठीण होत चालले आहे, असे मत उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांनी व्यक्त केले.
रावेत येथील संस्कार सोशल फाऊंडेशनच्या वतीने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या संस्कार विवाह नोंदणी संस्था वेबसाइटचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवगंत आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील व मातोश्री भागीरथी पाटील यांच्या हस्ते बटन दाबून या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, बापूसाहेब थोरात, संस्कार सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, कविता खंडागळे आदी उपस्थित होते.
फाऊंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या वधू वर सूचक मंडळाच्या वेबसाइटचा उपयोग गोरगरिबांना व्हावा, या हेतूने सुरू केले असल्याची माहिती अध्यक्ष खंडागळे यांनी दिली. पुढे त्या म्हणाल्या की, संस्कार सोशल फाऊंडेशनच्या अनेक सामाजिक ऊपक्रमात अजून एका चांगल्या कामाची सुरुवात व याचा सर्व समाजातील परीवारांना फायदा होईल असे मत व्यक्त करीत आमदार सुमन पाटील यांनी संस्कार विवाह नोंदणी संस्थेच्या वेबसाइटचे उद्घाटन केले.