IT अभियंता तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने खळबळ; भिंतीवर डाग अन् अभिलाषाच्या मैत्रिणीने पोलिसांना काय सांगितलं?

Pimpri Chinchwad News : पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथील द क्राउन ग्रीन सोसायटीमध्ये ३१ मे रोजी २१ व्या मजल्यावरून एका आयटी अभियंता असलेल्या तरुणीने आत्महत्या केली होती. अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (वय 25 वर्षे, रा. हिंजवडी) असे या मयत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. आत्महत्यापूर्वी या तरूणीने माझी जगायची इच्छा संपली आहे अशी सोसाईड नोट लिहून ठेवली होती.
या सोसाईट नोटमध्ये तिने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी ४ जून रोजी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला. पोलिसांना केलेल्या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नेमकी घटना कशी घडली?
अभिलाषा हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत नोकरी करीत होती. तिची एक मैत्रीण द क्राउन ग्रीन सोसायटीमध्ये राहत होती. 31 मे रोजी पहाटे ती मैत्रिणीकडे दुचाकीवरून आली. लिफ्टने इमारतीच्या 21 व्या मजल्यावर गेली. तेथून तिने उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत सोसायटीच्या पार्किंगमध्ये दुचाकीवरून पोलिसांनी अभिलाषाची मृतदेहाची ओळख पटवली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अभिलाषाच्या मैत्रीणीने पोलिसांना कोणती माहिती दिली हे समोर आले आहे.
मैत्रिणीने पोलिसांना काय सांगितलं?
हिंजवडीतील द क्राउन ग्रीन सोसायटीमध्ये अभिलाषा तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती. अभिलाषा रात्री एक वाजतापर्यंत रूममध्ये होती. त्यानंतर मी सकाळी पाच वाजता उठले त्यावेळी ती रूममध्ये दिसून आली नाही. बाथरुमच्या भिंतीवर त्यावेळी रक्ताचे पुसट डाग दिसले, त्यानंतर मी पुन्हा सकाळी दहा वाजता उठले असता, ती रुममध्ये आली नव्हती, अशी माहिती तिने दिली.
तिच्याशी संपर्क केला. मात्र तिचा फोन बंद होता. काही वेळाने मला पोलिसांचा फोन आल्यानंतर याबाबत समजले. त्यानंतर रुमची पाहणी केली असता अभिलाषाच्या बेडवर नॅपकिन व इतर रक्ताचे डाग दिसून आले असल्याचे देखील अभिलाषाच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा: Corona Virus : पुन्हा वाढतोय कोरोना ! मुंबईनंतर पुण्यातही रुग्णसंख्येत उड्डाण, ९८ नवे रुग्ण





