फुटीरतावादी हुरियत नेते गिलानींची दिल्लीतील संपत्ती आयकर विभागाकडून जप्त

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीरमधील हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शहा गिलानी यांच्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई करत दिल्लीतील महागडी संपत्ती जप्त केली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिल्लीतील मालवीय नगरमधील खिड़की एक्सटेंशन येथील गिलानी यांचा फ्लॅट जप्त केला आहे.

आयकर विभागाने गिलानी यांच्या मालमत्तेचे हस्तांतरण देखील प्रतिबंधित केले आहे. गिलानी हे 1996-97 पासून ते 2001-02 दरम्यान 3,62,62,160 रूपयांचा कर देण्यास असमर्थ ठरले असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1112638422911471616

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)