या सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर भारताने इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली आहे. या खबरदारीच्या सूचनांमध्ये भारताने तेथे राहणाऱ्या भारतीयांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. “ज्या भारतीय नागरिकांनी अद्याप दूतावासात नोंदणी केलेली नाही त्यांनी https://forms.gle/ftp3DEXgJwH8XVRdA या लिंकवर क्लिक करून ताबडतोब नोंदणी करण्याची विनंती केली आहे,” भारतीय दूतावासाने ट्विटरवर पोस्ट केले आहे. याबाबत भारताने एक हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. +972-547520711 आणि +972-543278392 या नंबरवर कॉलकरून मदत करू शकता. तर Email: consi.telaviv@mea.gov.in यावर मेल सेंड करत मदत मागू शकता. असेही त्यांनी लिहिले आहे. इस्रायलमधील भारतीय दूतावास तेथील अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून हवाई परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असल्याचे भारताने म्हटले आहे. इस्रायलमध्ये 32 हजार भारतीय राहतात. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापूर्वी सर्व नागरिक बॉम्बच्या आश्रयाला गेल्याचे वृत्त आहे. Israel Iran War । अमेरिकेने दिला इस्रायलला पाठिंबा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन सैन्याला इराणी हल्ल्यांपासून इस्रायलचा बचाव करण्यासाठी आणि इस्रायलला लक्ष्य करणारी क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी मदत करण्याचे निर्देश दिले आहे. तत्पूर्वी, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागण्याचे आदेश दिले आहे, असे इराणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते. ते म्हणाले की तेहरान कोणत्याही सूड कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. Israel Iran War । अमेरिकेने इशारा दिला होता हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा इस्रायल लेबनॉनमध्ये तेहरान समर्थित हिजबुल्लाहच्या विरोधात हवाई कारवाया करत आहे. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसराल्लाह यांच्या हत्येचा बदला इराणकडून घेतला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे, तर अमेरिकेने इस्रायलला इशारा दिला आहे की खमेनी राजवट त्यावर हल्ला करू शकते. Israel Iran War । पंतप्रधान मोदींनी नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जगात दहशतवाद आणि युद्धाला जागा नाही यावर भर दिला. त्याच वेळी, सोमवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या जनतेला संबोधित केले. इराणच्या राज्यकर्त्यावर टीका करताना ते म्हणाले की, इराणची सत्ता तुम्हाला दडपून टाकत आहे. असे करून हा संपूर्ण प्रदेश युद्धाकडे ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. इराणच्या शासकाचा मुख्य उद्देश जनतेचे कल्याण हा नसून लेबनॉन आणि गाझा येथील युद्धात पैसा वाया घालवणे हा आहे.