अवैध हत्यार बाळगणाऱ्या इसमास अटक
Updated On:

पाचोड : पाचोड पोलीसानी अवैध हत्यार बाळगणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेतल आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोड पोलिसांना एक इसम तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी सापळा रचून त्या इसमास अंबड फाटा येथे पकडले.
गणेश कडुबाळ गवारे वय २७ वर्षे रा. पाचोड ता.पैठण याची तपासणी केली असता त्याच्याजवळ अवैध हत्यार आढळले. अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून इसमास अटक करण्यात आली आहे.





