ब्रुनेईमध्ये इस्लामिक कायद्याची अंमलबजावणी

बंडाअर सेरी बेगावान (ब्रुनेई) – ब्रुनेईमध्ये बुधवारी कठोर शरीया कायदा लागू करण्यात आला. व्यभिचार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधांसारख्या गुन्ह्याला दगडाने ठेचून मारणे आणि शरीया कायद्याच्या अंमलबजावणीमुळे चोरांचे हात-पाय तोडण्याच्या शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये आहे. ब्रुनेईमधील या घडामोडींवर जगभरातून जोरदार टीका व्हायला लागली आहे.

बोमेओ बेटावरील ब्रुनेई या छोट्याशा देशामध्ये सुलतान हसनाल बोलकिया यांची राजेशाही अस्तित्वात आहे. ब्रुनेईचे सुलतान गेल्या पाच दशकांपासून राजपदावर आहेत. ब्रुनेई हा देश पाहुण्यांसाठी पारदर्शक आणि पर्यावरणस्नेही असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशात शरीया कायदा लागू झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय पातळीवर कठोर शरीया कायदा स्वीकारणारा नैऋत्य आशिया खंडातील ब्रुनेई हा पहिलाच देश आहे. यापूर्वी मध्यपूर्वेतील सौदी अरेबियासारख्या अन्य काही देशांमध्येही शरीया कायदा स्वीकारण्यात आला आहे.

या कायद्यानुसार बलात्कार, दरोडा यासारखे गुन्हेही देहदंडाच्या शिक्षेस पात्र आहेत. याशिवाय प्रेषित मोहम्मद यांचा अवमान करण्याच्या गुन्ह्याला बिगर मुस्लिम व्यक्‍तींना देहदंडाची शिक्षा आहे. संयुक्‍त राष्ट्राने ब्रुनेईमधील या घडामोडींबबत तीव्र चिंत व्यक्‍त केली आहे. हा निर्णय म्हणजे “क्रूर आणि अमानवी’ आहे, असे कलाकर जॉर्ज क्‍लूनी आणि पॉप स्टार एल्टन जॉन यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.