Entertainment | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकर बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. ईशाला खल्लास गर्लचा टॅग मिळाला आहे. तिचे हे गाणे खूप गाजले. या अभिनेत्रीने ‘फिजा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ईशाने बॉलिवूडसोबतच साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ईशा तिच्या एका खुलाशामुळे चर्चेत आहे. अलीकडेच ईशा कोप्पीकरने एका मुलाखतीदरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे. ईशाला कास्टिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने उत्तर दिले की, ‘खरं सांगू, असं कधीच घडलं नाही की दिग्दर्शक तुम्हाला विचारतील की, तुम्ही काय करू शकता आणि काय नाही. अभिनेत्यांनी अनेकदा ठरवलं असत की अभिनेत्री काय करतील.’ ईशा कोप्पीकरने आपल्या वक्तव्याचा शेवट असे सांगून केला की, मी टू मध्ये सत्य आहे. जर तुमचा मूल्यांवर विश्वास असेल तर तुमच्यासाठी उद्योगात टिकून राहणे खूप कठीण आहे. कास्टिंग काउचच्या भीतीने इंडस्ट्री सोडणाऱ्या अनेक मुली आहे. तेथे मुलींना एकतर सहमती द्या किंवा सोडून द्या असे सांगितले जाते. इंडस्ट्रीत असे खूप कमी लोक आहेत ज्यांनी हार मानली नाही आणि मी त्यापैकी एक आहे. कास्टिंग काउचबद्दल बोलताना ईशा कोप्पीकर म्हणाली की, ‘एकदा एका मोठ्या नायकाने तीला एकटेच भेटायला सांगितले. एवढेच नाही तर ड्राइवरलाही सोबत आणण्यासही नकार दिला होता. त्या मोठ्या हिरोने तिला सांगितले की जर तिला बॉलीवूडमध्ये टिकायचे असेल तर तिला तडजोड करावी लागेल.’ असं म्हणत तिने कास्टिंग काउचबद्दल खुलासा केला.