बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने तिचा एक क्रेझी डान्स व्हिडीओ शेअर केला आहे, जो तुम्हाला पुन्हा क्लिक करून पाहायला नक्कीच आवडेल. विशेष म्हणजे, ईशाने तिच्या चाहत्यांना एकाच वेळी दोन आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत. या व्हिडीओ डान्ससह टिकटॉकवरही डेब्यू केले असल्याचे तिने सांगितले आहे.
ईशा गुप्ता सतत आपले बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते, पण यावेळी चांगली बातमी अशी आहे की तिने डान्स करून स्वत:चा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
एकीकडे इंस्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत, तर दुसरीकडे ईशाने टीकटॉकवर दमदार डेब्यू केले आहे. तिने या दोन्ही आनंदाचे वृत्त आपल्या सुंदर डान्स व्हिडीओसह चाहत्यांसाठी शेअर केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तिचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान, ईशा गुप्ताला बॉलिवूडमध्ये नुकतेच 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. ईशा गुप्ताने दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या “जन्नत 2′ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात तिच्यासोबत इमरान हाश्मी आणि रणदीप हुडा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.