Veer Pahariya : तारा सुतारियासोबतच्या ब्रेकअपनंतर वीर पहारिया पुन्हा प्रेमात? मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडिओ व्हायरल
Veer Pahariya : अद्याप तारा किंवा वीर या दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही

Veer Pahariya : गायक ए. पी. ढिल्लोंच्या मुंबईतील कॉन्सर्टच्या वादामुळे तारा सुतारिया आणि वीर पहारिया यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत. त्यानंतर आता वीर पहारिया पुन्हा प्रेमात पडला असल्याचे म्हंटले जात आहे. कारणं वीर पहारिया मुंबईत मिस्ट्री गर्लसोबत दिसला असून त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. Veer Pahariya
सेलिब्रिटी पापाराझी सरोज मेहरानं वीर पहारियाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेता मिस्ट्री गर्लसोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसतो. रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यावर, ती मुलगी थेट तिच्या गाडीकडे गेली, पण वीर थांबला आणि पापाराझींशी बोलला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच… Veer Pahariya
View this post on Instagram
तारा सुतारियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर वीर पहारियाला पुन्हा प्रेम मिळालं आहे का, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. ‘मुलं इतक्या लवकर मूव्ह ऑन कशी होतात?’ ‘ते एकमेकांना डेट करत आहेत का?’ असा सवाल नेटकरी कमेंटमध्ये करत आहेत. तर अनेक जण ही मिस्ट्री गर्ल कोण आहे? अशी विचारणा करत आहेत. Veer Pahariya
दरम्यान, तारा सुतारिया आणि वीर पहारिया हे २०२५ मध्ये त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले होते. दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. पण त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या. परंतु तारा किंवा वीर या दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. Veer Pahariya
हेही वाचा:





