Sanjog Waghere | नुकतेच पिंपरी चिंचवड शहरात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आले होते. बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्ष पदावर वर्णी लागल्याने त्यांचे शहरात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. मात्र या कार्यक्रमात ठाकरे गटातील नेत्याने हजेरी लावल्याने चर्चांना उधान आले आहे. ठाकरे गटातील संजोग वाघेरे यांनी बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात की काय अशा चर्चा झडू लागल्या आहेत. संजोगे वाघेरे यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. मूळात वाघेरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलीच होते. मात्र, त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसअगोदर ठाकरे गटात प्रवेश केला. आता पुन्हा एकदा संजोग वाघेरे सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधासभेच्या उपाध्यक्षापदी निवड झाल्यानंतर त्यांचा पिंपरी चिंचवड येथील भक्ती शक्ती येथे सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे वाघेरे हे स्वगृही येणार असल्याची चर्चा केल्या जात आहे. संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे. त्यांनी पक्षात असताना पिंपरी चिंचवड शहरातील अनेक महत्वाच्या पदे भूषवलेली आहेत. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसनेत प्रवेश केला होता. त्यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.