“हे ‘व्हाईट वॉश’ मंत्री मंडळ आहे का?”; यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळ विस्तारावर खोचक सवाल

Updated On:

मुंबई : राज्यात नव्याने सत्ता स्थापन झाल्यानंतर आज तब्बल ४० दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपच्या १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.  दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमाती ठाकूर यांनी टीका केली आहे.

त्याविषयी बोलताना ठाकूर यांनी,”राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना जाणीवपूर्वक डावलले गेल्याकडे लक्ष वेधतानाच शिंदे-फडणवीस सरकारचे हे ‘व्हाईट वॉश’ मंत्री मंडळ आहे का ? असा प्रश्न पडला आहे. राज्य मंत्रीमंडळ विस्तार म्हणजे एखादा विनोद व्हावा अशी कृती दिसत आहे.”

तसेच एकाही महिलेला मंत्रीपदी संधी दिली नाही, हे आश्चर्य आहे. तर भाजप नावाची वॉशिंग पावडर चारित्र्य साफ करत असल्याने हे शिंदे-फडणवीस सरकारचे हे ‘व्हाईट वॉश’ मंत्री मंडळ आहे का ? शिवाय आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आता भाजपच्या चित्रा वाघ यांची भूमिका काय असेल याकडेही लक्ष वेधले आहे.

९ ऑगस्ट क्रांतिदिनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आझादी गौरव पद यात्रेनिमिताने आयोजित कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

2026-10-07 22:53:07

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

2026-10-07 19:06:35

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव