‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सीक्वल येणार आहे का? फरहान अख्तर म्हणाला …

2011 मध्ये दिग्दर्शिका झोया अख्तरने ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामध्ये तीन मित्रांची (अर्जुन, कबीर आणि इमरान) कथा दाखवण्यात आली होती जे रोड ट्रिपला जातात. या चित्रपटात हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत दिसले होते.’लोकांना हा चित्रपट इतका आवडला की, लोकांना या तिन्ही मित्रांना पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा होती. सोशल मीडियावर लोक निर्मात्यांना त्याचा सीक्वल बनवण्याची मागणी करत आहेत.’
आता या चित्रपटाची इमरान म्हणजेच फरहाना अख्तर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा २’ बद्दल बोलला आहे. त्याने सांगितले,’ आम्ही ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटात ‘दोबारा’ हा शब्द वापरला आहे. मग दुसऱ्या भागाला काय म्हणणार? आमच्याकडे कथा आहे, पण शीर्षक नाही, म्हणून आम्ही अडकलो आहोत. चित्रपट निर्मितीच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे. असं म्हणत तो पुढे म्हणाला, मात्र, हा केवळ विनोद होता. तो पुढे म्हणतो, आम्हा सर्वांना त्याचा सिक्वेल बनवायचा आहे, कारण हा चित्रपट आवडला आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या सिक्वेलबद्दल आम्हाला अनेकदा विचारले जाते. त्यामुळे आम्हाला आशा आहे की झोया सिक्वेलसाठी काहीतरी घेऊन येईल. अशी आम्ही आशा करतो.’
जिंदगी ना मिलेगी दोबारा हिट झाला होता. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. रिपोर्टनुसार, हा चित्रपट बनवण्यासाठी 60 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. जगभरात या चित्रपटाचे एकूण 153 कोटींचे कलेक्शन होते. या चित्रपटात कतरिना कैफ, कल्की कोचलिन, नसीरुद्दीन शाह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.





