Ajay Devgn | अभिनेता अजय देवगणचा 2020 साली प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शूरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा दाखवणाऱ्या या चित्रपटात अजय देवगण मुख्यभूमिकेत होता. तर अभिनेत्री काजोल हिची देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती. यशानंतर आता या सिनेमाच्या सीक्वलच्या चर्चा सुरू झाली आहे. त्याचे कारण म्हणजे अजय देवगणने शेअर केलेली खास पोस्ट आहे. ‘तान्हाजी’ सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने अजय देवगणने खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्याने सिनेमाच्या सीक्वलची हिंट दिली आहे. ‘तान्हाजी’ सिनेमाचं एक स्केच अजय देवगणने शेअर केलं आहे. “गड आला पण सिंह गेला… पण कथा अजून संपलेली नाही”, असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. अजय देवगणच्या या पोस्टमुळे ‘तान्हाजी’ सिनेमाचा सीक्वल येणार असल्याचं बोललं जात आहे. Ajay Devgn | शरद केळकरनेही शेअर केली पोस्ट अभिनेता शरद केळकरनंही इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोस्टसह त्यानं ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ला सहा वर्षे पूर्ण झाली. किती अदभुत अनुभव होता… “जय भवानी, जय शिवाजी”, असं लिहिलं आहे. Ajay Devgn | ‘तान्हाजी’ सिनेमा ओम राऊतने दिग्दर्शित केला होता. या सिनेमात काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. शरद केळकरने सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. ज्याचं सर्वत्र कौतुकही झालं होतं. याशिवाय यात अजिंक्य देव, देवदत्त नागे, शशांक शेंडे, देवेंद्र गायकवाड, कैलास वाघमारे, धैर्यशील घोलप हे मराठी कलाकारही झळकले होते. Ajay Devgn | दरम्यान, ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली होती. या चित्रपटानं जगभरात सुमारे ३६७.६५ कोटी रुपयांची कमाई केली. Ajay Devgn | हेही वाचा: अजितदादांंचा एकेरी उल्लेख; महेश लांडगेंवर रुपाली पाटील ठोंबरे भडकल्या, थेट शब्दांत ठणकावलं