PCOD आणि PCOS मुळे मासिक पाळी अनियमित? जाणून घ्या घरगुती उपाय,आहार आणि व्यायाम

PCOD,PCOS: सध्या अनेक तरुणींना आणि महिलांना मासिक पाळी अनियमित येण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे PCOD (Polycystic Ovarian Disease) आणि PCOS (Polycystic Ovary Syndrome) हे हार्मोनल विकार. या समस्या वेळेवर ओळखून योग्य उपाय योजना केल्या तर मासिक पाळी नियमित होऊ शकते.
या विकारांचं निदान वेळेवर झालं तर घरगुती उपाय, योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतले काही बदल करून त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. या रिपोर्टमध्ये आपण हे सगळं सविस्तर पाहणार आहोत.
*PCOD आणि PCOS म्हणजे काय?
PCOD (Polycystic Ovarian Disease): हा एक हार्मोनल डिसऑर्डर असून यामध्ये स्त्रियांच्या अंडाशयामध्ये अनेक लहान-सहान सिस्ट्स तयार होतात.
PCOS (Polycystic Ovary Syndrome): हा PCOD पेक्षा गंभीर प्रकार आहे. यात फक्त अंडाशयांवर परिणाम न होता संपूर्ण शरीरावर होतो, विशेषतः इंसुलिन रेसिस्टन्स, वजनवाढ, हार्मोनल असंतुलन यांचं प्रमाण वाढतं.
*लक्षणे कशी ओळखावीत?
1. मासिक पाळी अनियमित येणे किंवा थांबणे
2. चेहऱ्यावर किंवा शरीरावर जास्त केस येणे
3. वजन झपाट्याने वाढणे
4. पिंपल्स किंवा तेलकट त्वचा
5. केस गळती आणि टक्कल
6. गडद त्वचेचे डाग (neck, underarms)
7. थकवा, मूड स्विंग्स
8. गर्भधारणेत अडचणीजाणून घ्या योग्य आहार (Diet for PCOD/PCOS)
*जाणून घ्या योग्य आहार (Diet for PCOD/PCOS)
1. हाय फायबर पदार्थांचा समावेश करा: ज्वारी, बाजरी, रागी, ओट्स, फळं, भाज्या
2. प्रोटीनयुक्त आहार: डाळी, हरभरा, टोफू, अंडी, लो फॅट दही
3. शुगर कट करा: साखर, मिठाई, बेकरी पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा
4. सेंद्रिय आणि नैसर्गिक अन्न: फास्ट फूड, प्रोसेस्ड फूड, जंक फूड शक्यतो टाळा
5. पाणी भरपूर प्या: किमान २.५ ते ३ लिटर दररोज

*व्यायाम आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी
1. योगासने:
भुजंगासन – हार्मोन बॅलन्स करते
धनुरासन – पेल्विक भागातील रक्तप्रवाह वाढवते
बद्धकोणासन – अंडाशयासाठी फायदेशीर
नाडी शुद्धी प्राणायाम – मानसिक शांती आणि हार्मोन संतुलन
2. कार्डिओ व्यायाम:
रोज ३० ते ४५ मिनिटे चालणे, सायकलिंग, झुंबा, किंवा रनिंग
BMI कमी ठेवणं महत्त्वाचं आहे
3. स्ट्रेचिंग आणि पिलेट्स:
शरीर लवचिक आणि सुदृढ ठेवण्यासाठी

*घरगुती उपाय (Home Remedies)
1. मेथीदाण्याचं पाणी: रात्री मेथीदाणे भिजवून सकाळी उपाशीपोटी त्याचं पाणी प्यावं
2. दालचिनी: यामध्ये इंसुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्याचे गुणधर्म असतात
3. अश्वगंधा: तणाव कमी करण्यासाठी
4. आल्याचं सेवन: अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे मासिक पाळी नियमित करण्यात मदत
5. अळशीच्या बिया (Flax Seeds): हार्मोन बॅलन्स करण्यासाठी दररोज एक चमचा
*काळजी कशी घ्यावी?
नियमित झोप (७–८ तास)
स्ट्रेस कमी करा – ध्यान, प्राणायाम, म्युझिक थेरपी
वेळच्या वेळी जेवण
वजन नियंत्रणात ठेवणं आवश्यक
दर ३ ते ६ महिन्यांनी डॉक्टरांकडून तपासणी
सेल्फ-मेडिकेशन टाळा
PCOD किंवा PCOS चा त्रास दीर्घकाळ राहू शकतो. त्यामुळे संयम, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला घेत राहणं आवश्यक आहे. घरगुती उपाय उपयोगी ठरतात, पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुरू करू नयेत.




