विराटने घेतली डिव्हिलीयर्सची गळाभेट

दुबई – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आता संपूर्णपणे आयपीएलसाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडमधून युएईत पोहोचलेला विराट नुकताच विलगीकरणाचा कालावधी संपवून मैदानात सरावासाठी उतरला आहे. कर्णधार विराट इतर आरसीबी संघातील खेळाडूंना नुकताच भेटला असून या सर्व भेटीचा व्हिडीओ आरसीबीने त्यांच्या ट्‌विटरवर शेअर केला.

यामध्ये विराट एकदम जोशात दिसत असून त्याने त्याचा सहकारी एबी डिव्हिलीयर्सची घेतलेली गळाभेट सर्वांचच मन जिंकत आहे. विराट कोहली आधी इंग्लंडमध्ये पाचवी कसोटी खेळून मग युएईमध्ये आरसीबी संघासोबत जोडला जाणार होता.

पण पाचवी कसोटी रद्द झाल्यामुळे विराट वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसोबत 12 सप्टेंबर रोजीच युएईत दाखल झाला. त्यानंतर सहा दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपूवत तो मैदानात सरावासाठी उतरला आहे. आता पहिला सामना आरसीबी सोमवारी म्हणजे 20 सप्टेंबरला कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्ध खेळणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.