यंदाच्या कान्सवर इराणीयन चित्रपटाची मोहर…! ‘इट वॉज जस्ट एन अॅक्सिडेंट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

Cannes Film Festival : ७८ व्या कान्स चित्रपट महोत्सवाची सांगता शनिवार २४ मे रोजी मोठ्या दिमाखात करण्यात आली. या चित्रपट महोत्सवात जगभरातील अनेक चित्रपट दाखवण्यात आले. त्यापैकी काहींना यश मिळाले, तर काहींना निराशा मिळाली. कान्स चित्रपट महोत्सवाचे फ्रान्समध्ये आयोजन करण्यात आले होते. १३ मे ते २४ मे दरम्यान हा चित्रपट महोत्सव सुरू होता. या महोत्सवात भारत आणि परदेशातील प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. यंदाच्या कान्समध्ये जाफर पनाही (Jafar Panahi) यांच्या ‘इट वॉज ‘जस्ट एन अॅक्सिडेंट चित्रपटाला सर्वात्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
जगभरातून आलेले अनेक चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आले. ज्यामध्ये अनेक चित्रपट आणि कलाकारांना पुरस्कार मिळाले. भारतीय दिग्दर्शक नीरज घायवान यांच्या ‘होमबाउंड’ चित्रपटाचे कान्समध्ये खूप कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजून दाद दिली होती. तब्बल नऊ मनिटे टाळ्या वाजविण्यात आल्या होत्या. यामुळे होमबाऊंडला पुरस्कार मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही.
View this post on Instagram
याशिवाय, भारताला बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ कडूनही आशा होत्या, परंतु या चित्रटालाही कोणताही पुरस्कार मिळाला नाही. यंदाचा ७८ वा कान्स चित्रपट महोत्सव इराकसाठी खास होता. कारण येथील चित्रपटाने पहिला पुरस्कार जिंकला. हसन हादी यांना त्यांच्या ‘प्रेसिडेन्ट्स केक’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा कॅमेरा डी’ओर हा पुरस्कार मिळाला. तर इराणी चित्रपट निर्माते जाफर पनाही यांना ‘इट वॉज जस्ट एन अॅक्सिडेंट’ चित्रपटासाठी पाम डी’ओर पुरस्कार मिळाला.
२०२५ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये विजेत्यांची नावे:
सर्वोत्कृष्ट चित्रपट (Palme d’Or):
जाफर पनाही (Jafar Panahi) यांच्या ‘इट वॉज जस्ट एन अॅक्सिडेंट’
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:
नादिया मेल्लीटी (Nadia Melliti), ‘द लिटिल सिस्टर’ (The Little Sister).
सर्वोत्कृष्ट पटकथा:
लु आणि जीन-पियरे डार्डन (Luc and Jean-Pierre Dardenne), ‘यंग मदर्स’ (Young Mothers).
कॅमेरा डी’ओर (Camerad’Or):
हा पुरस्कार सर्वोत्तम पहिल्या चित्रपटासाठी दिला जातो.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय विजेते:
मृणाल सेन:
‘खारिज’ या चित्रपटासाठी स्पेशल ज्युरी अवॉर्ड.
नजू:
‘बूट पॉलिश’ या चित्रपटासाठी स्पेशल डिस्टिंक्शन अवॉर्ड.
ऑल दॅट ब्रीथ्स (All That Breaths):
या माहितीपटासाठी गोल्डन आय पुरस्कार.





