‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४’चा भाग
\nही कारवाई इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)कडून राबवण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४’ अंतर्गत करण्यात आली. इराणने याला मोहिमेची ८३वी लाट (वेव्ह) असे म्हटले आहे.
\nइराणच्या निवेदनानुसार, या हल्ल्यांमध्ये अमेरिकन आणि इस्रायली लष्करी तळ तसेच महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. यात अशदोद येथील तेल साठवणूक केंद्र, मोडीनजवळील लष्करी ठिकाणे, तसेच अमेरिकन माहिती देवाणघेवाण केंद्राचा समावेश आहे. याशिवाय अल-धाफ्रा, अल-उदेरी, अली अल-सालेम आणि शेख इसा एअर बेसवरही हल्ले केल्याचा दावा करण्यात आला. या कारवाईत लांब व मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे, अचूक प्रहार करणारी शस्त्रे आणि ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे इराणने म्हटले आहे.
\nहेही वाचा – India Defence: 2.38 लाख कोटींची शस्त्रखरेदी मंजूर; S-400 आणि नवी विमानं मिळणार
\nभारताचा उल्लेख का?
\nया संदेशांमध्ये भारताचा उल्लेख होण्यामागे काही कारणे पुढे आली आहेत. अलीकडेच इराणने होर्मूझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची परवानगी दिली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी भारताला ‘मैत्रीपूर्ण देश’ म्हणून संबोधले आहे.
\nभारतीयांकडून मानवतावादी मदत
\nयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातून, विशेषतः जम्मू-काश्मीरमधून इराणसाठी मदतीचे उपक्रम राबवले जात आहेत. नागरिकांनी रोख रक्कम, दागिने आणि घरगुती वस्तूंचे दान केले आहे. एका काश्मिरी महिलेने आपल्या दिवंगत पतीच्या आठवणीत जपलेले सोनं दान केल्याची घटना विशेष चर्चेत आली. भारतातील इराणी दूतावासाने या मदतीबद्दल आभार मानत “ही मदत कधीही विसरणार नाही,” असे म्हटले आहे.
\nमुलांकडूनही मदत
\n‘Iran in India’ या अधिकृत हँडलने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. भारतीय लहान मुलांनी इराणमधील मिनाब शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आपले गुल्लक (पिगी बँक) दान केले. या घटनेला करुणा आणि मानवतेचे प्रतीक असल्याचे दूतावासाने म्हटले आहे. मिनाब येथील शाळेवर झालेल्या हल्ल्यात अनेक मुलांचा मृत्यू झाल्याने जागतिक स्तरावर सहानुभूती व्यक्त होत आहे.
\nभारताची संतुलित भूमिका
\nदरम्यान, भारताने पश्चिम आशियातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर भर दिला आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षात भारताने संतुलित भूमिका घेतली असून, इराणशी असलेले संबंध आणि अमेरिका-इस्रायलशी असलेले संबंध यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"War Updates: इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांवर लिहिले “Thank You India”; युद्धात भारताचा उल्लेख का?","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/03/war-update-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/iran-writes-thank-you-india-on-fresh-wave-of-missiles-launched-at-israel#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/03/war-update-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/iran-writes-thank-you-india-on-fresh-wave-of-missiles-launched-at-israel#webpage","name":"War Updates: इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांवर लिहिले “Thank You India”; युद्धात भारताचा उल्लेख का?","url":"https://www.dainikprabhat.com/iran-writes-thank-you-india-on-fresh-wave-of-missiles-launched-at-israel","inLanguage":"mr","description":"War Updates: या संदेशांमध्ये भारताचा उल्लेख होण्यामागे काही कारणे पुढे आली आहेत. अलीकडेच इराणने होर्मूझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची परवानगी दिली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी भारताला ‘मैत्रीपूर्ण देश’ म्हणून संबोधले आहे.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/iran-writes-thank-you-india-on-fresh-wave-of-missiles-launched-at-israel#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/03/war-update-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/iran-writes-thank-you-india-on-fresh-wave-of-missiles-launched-at-israel#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/iran-writes-thank-you-india-on-fresh-wave-of-missiles-launched-at-israel","name":"War Updates: इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांवर लिहिले “Thank You India”; युद्धात भारताचा उल्लेख का?"}}]}}}