Iran-US war: संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वथनेनी हरीश यांनी इराण आणि आखाती प्रदेशात सुरू असलेल्या युद्धावर भारताची स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी याविषयी बोलताना, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी या प्रदेशात लढाई सुरू झाल्यापासून भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे,असे सांगितले. भारताने सर्व देशांना संयम बाळगण्याचे, परिस्थिती आणखी चिघळू न देण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. त्यांनी पुढे, “अशा संघर्षांची तीव्रता कमी करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हा सर्वोत्तम मार्ग आहे”, असे भारताने सातत्याने म्हटले आहे” असेही म्हटले आहे. त्यांनी सर्व देशांना त्यांचे मतभेद शांततेने सोडवण्याचे आणि कोणतीही आक्रमक कृती टाळण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याच्या महत्त्वावर भर दिला. (Iran-US war) व्यापारी जहाजांनाही लक्ष्य करण्यात आले (Iran-US war ) हरीश यांनी या युद्धादरम्यान व्यापारी जहाजांनाही लक्ष्य करण्यात आल्याबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “या हल्ल्यांमध्ये जहाजांवर कार्यरत असलेल्या भारतीय खलाशांनाही आपले प्राण गमवावे लागले, ही अत्यंत दुःखद घटना आहे. ” Iran-US war भारताचा विश्वास आहे की, “व्यापारी जहाजांवर हल्ला करणे पूर्णपणे चुकीचे आहे, कारण त्यामुळे निष्पाप लोकांचे जीवन धोक्यात येते आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यत्यय येतो. त्यांनी विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीचा उल्लेख केला, जो जगासाठी एक महत्त्वाचा सागरी मार्ग आहे.” Iran-US war भारताने स्पष्टपणे सांगितले की, “या मार्गातून होणारी वाहतूक आणि व्यापार कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहिला पाहिजे. तेथील कोणताही अडथळा किंवा धमकी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असून ती अस्वीकार्य आहे.” भारताने सर्व देशांना पुन्हा आवाहन केले की, त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करावा आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजवाहतूक व जागतिक व्यापार सुरक्षितपणे आणि सुरळीतपणे सुरू राहील याची खात्री करावी. Iran-US war