Iran US Tensions: अमेरिकेच्या कारवाईमुळे इराणचा तिळपापड ; कुवेत, बहरीनमधील अमेरिकी तळ उद्धवस्त , होर्मुझही केले बंद
Iran US Tensions: पश्चिम आशियामध्ये तणाव वाढतच आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) कुवेत आणि बहरीनमधील अनेक प्रमुख अमेरिकी लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.

Iran US Tensions: पश्चिम आशियामध्ये तणाव वाढतच आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) कुवेत आणि बहरीनमधील अनेक प्रमुख अमेरिकी लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केल्याची घोषणा केली असून सर्व जहाजांना त्या भागापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.
कुवेत आणि बहरीनमधील १८ तळांवर हल्ल्याचा दावा (Iran US Tensions)
IRGC ने एक निवेदन जारी करून, त्यांच्या प्रत्युत्तरात्मक लष्करी कारवाईत कुवेतमधील अली अल-सलेम आणि अहमद अल-जाबेर हवाई तळ आणि बहरीनमधील शेख ईसा हवाई तळासह १८ प्रमुख अमेरिकी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले” असे म्हटले आहे. इराणी लष्कराच्या मते, “ही कारवाई इराणमधील अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली.”
सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे हवाई हल्ले
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) सलग दुसऱ्या दिवशी इराणमधील अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. अमेरिकेने या हल्ल्यांचे वर्णन “आत्मसंरक्षणासाठी केलेली कारवाई” असे केले आहे. तर तिकडे इराणी माध्यमांनुसार, “हल्ल्यांदरम्यान देशाच्या दक्षिण भागात आणि पश्चिम तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले.” असे संगणयत आले आहे. अनेक भागांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणाही सक्रिय करण्यात आली होती. (Iran US Tensions)
होर्मुझची सामुद्रधुनी बंद, जहाजांना इशारा
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर, इराणच्या सर्वोच्च लष्करी नेतृत्वाने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केल्याची घोषणा केली. हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी तेल मार्गांपैकी एक मानला जातो, ज्यातून जागतिक तेल पुरवठ्याचा मोठा भाग जातो. इराणने सर्व जहाजांना या भागापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.
‘त्या’ जहाजांवर कारवाई करण्याचा दावा
आयआरजीसीने दावा केला आहे की, त्यांच्या दलांनी बंद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जहाजांना लक्ष्य केले. आयआरजीसीनुसार, त्यांच्या हवाई आणि नौदल तुकड्यांनी दोन टप्प्यांत प्रत्युत्तर देत अमेरिकी सैन्य असलेल्या लष्करी तळांवर हल्ला केला.
“आम्ही या भागाचे नरकात रूपांतर करू” (Iran US Tensions)
आयआरजीसीच्या हवाई दलाचे प्रमुख मेजर जनरल माजिद मौसवी यांनी अमेरिकेच्या हल्ल्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. इराणची वृत्तसंस्था तस्निमच्या एका अहवालानुसार, ते म्हणाले की, जर अमेरिकेने होर्मुझची सामुद्रधुनी असुरक्षित करण्याचा प्रयत्न केला, तर इराण त्यांच्यासाठी संपूर्ण प्रदेश नरक बनवेल.
मौसवी म्हणाले, “तुम्ही पवित्र होर्मुझची सामुद्रधुनी असुरक्षित करत आहात का? आम्ही संपूर्ण इराणमधून तुमच्यासाठी हा प्रदेश नरक बनवू.” ते पुढे म्हणाले, “या प्रदेशातील अमेरिकेच्या या धाडसी कृतीला निश्चितपणे प्रत्युत्तर दिले जाईल.”असा इशारा देखील देण्यात आला होता.






