US-Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणमधील युद्ध (War 2026) आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘ऑपरेशन एपिक फ्यूरी’ आणि बी-५२ बॉम्बर्सच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणने माघार न घेता शांततेसाठी आपल्या ५ अटी जगासमोर ठेवल्या आहेत. ‘तेहरान टाइम्स’च्या वृत्तानुसार, या अटी मान्य न झाल्यास आखाती देशांत मोठा विध्वंस होईल, असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या ५ प्रमुख अटी – १. हल्ले आणि हत्या त्वरित थांबवा: अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील हवाई हल्ले आणि त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या ‘टार्गेट किलिंग’च्या मोहिमा पूर्णपणे बंद कराव्यात, तरच चर्चा शक्य आहे. २. आंतरराष्ट्रीय सुरक्षा हमी: भविष्यात इराणच्या सार्वभौमत्वावर कधीही हल्ला होणार नाही, याची कायदेशीर आणि लेखी हमी संयुक्त राष्ट्र व आंतरराष्ट्रीय समुदायाने द्यावी. ३. युद्धाची भरपाई: युद्धादरम्यान इराणचे तेल डेपो, लष्करी तळ आणि पायाभूत सुविधांचे जे नुकसान झाले आहे, त्याची अब्जावधी डॉलर्सची आर्थिक भरपाई अमेरिकेने करावी. ४. सहकारी संघटनांवरील कारवाई बंद करा: केवळ इराणच नव्हे, तर हिजबुल्लासारख्या इराणच्या मित्र संघटनांवरील लष्करी कारवाया मध्यपूर्वेत त्वरित थांबवण्यात याव्यात. ५. होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण: जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘होर्मुझ सामुद्रधुनी’वर (Strait of Hormuz) इराणच्या वर्चस्वाला मान्यता द्यावी. अटी मान्य न झाल्यास हा मार्ग कायमचा बंद करण्याची धमकी इराणने दिली आहे. हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते; पहा सर्व नेत्यांची यादी भारतावर होणार मोठा परिणाम – या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या पार गेले आहेत. याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असून, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. पाकिस्तान आणि तुर्की सध्या मध्यस्थीचा प्रयत्न करत असले, तरी अमेरिकेने इराणची क्षेपणास्त्र शक्ती पूर्णपणे नष्ट करण्याचा पवित्रा घेतल्याने तणाव कायम आहे.