कोरोनाचे इराणमध्ये आणखी 97 बळी; मृतांची संख्या 611 वर
Updated On:

तेहरान : इराणमध्ये कोरोनाने आणखी 97 जण मरण पावले. त्यामुळे मृतांची संख्या 611 वर पोहोचली आहे. तर बाधीतांची संख्या 12 हजार 729वर पोहोचली आहे. मध्य पुर्वेत कोरोनाचा सर्वाधिक फटका इराणला बसला आहे. तेथील अनेक वरीष्ठ अधिकाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.
इराणमध्ये बाधीतांची संख्या वेगाने वाढत असल्याने अनेक शहरात फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शाळा आणि स्टेडीयम बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र तेहरानमध्ये धार्मिक प्रार्थनास्थळे आणि बाजार पेठ अद्याप खुल्या आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे.
सध्या बाधा झालेल्यांमध्ये ताप आणि सर्दी खोकला झाल्याचे आढळत आहेत. काही वयस्कर आणि श्वसनाचे विकार असणाऱ्यांमध्ये न्युमोनियासह अन्य गंभीर आजार झाले आहेत, असे इराण सरकारच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.
टॅग्स:





