Iran Israel War: मध्य पूर्वेत सुरु असणाऱ्या बॉम्बस्फोट आणि हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाला २५ दिवस उलटले असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धविराम आणि शांतता चर्चेच्या दिशेने मोठी पावले उचलत आहेत. खुद्द ट्रम्प यांनी त्यांच्या दूतांनी इराणमधील एका ‘उच्च पदावरील व्यक्ती’सोबत खूप चांगली चर्चा केली, ज्यात अनेक मुद्द्यांवर करार झाले असल्याची महत्वाची माहिती दिली आहे. दरम्यान , ट्रम्प याची हे गुप्त मुत्सद्देगिरी ही हे युद्ध नेमके कोणत्या वळणावर घेऊन जाणार हे येणार काळच ठरवेल. परंतु ट्रम्प यांच्या राजनैतिक कार्याचे नेतृत्व तीन प्रमुख व्यक्ती म्हणजेच स्टीव्ह विटकॉफ, जेरेड कुशनर आणि इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबा हे करत आहेत. या तीन व्यक्तीच्या माध्यमातून अमेरिका सध्या सुरु असणारा युद्ध थांबवण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान आता हे युद्ध ज्यांच्या माध्यमातून थांबवण्याचा ट्रम्प प्रयत्न करत आहेत ते विटकॉफ, कुशनर आणि गॅलिबाफ नेमके कोण आहेत? ते नेमके कोण आहेत हे जाणून घेऊ… स्टीव्ह विटकॉफ कोण आहेत? Iran Israel War: स्टीव्ह विटकॉफ हे न्यूयॉर्कमधील एक प्रसिद्ध रिअल इस्टेट डेव्हलपर, गुंतवणूकदार आणि विटकॉफ ग्रुपचे संस्थापक आहेत. ते चार दशकांपासून ट्रम्प यांचे जवळचे मित्र आहेत आणि ट्रम्प यांचे गोल्फ पार्टनरही आहेत. US Israel Iran War : इस्रायल लेबनॉनच्या १० टक्के भूभागावर कब्जा करणार ; इस्रायली संरक्षण मंत्र्यांचा मोठा दावा ट्रम्प यांनी विशेष दूत म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. विटकॉफ यांना कोणताही औपचारिक राजनैतिक अनुभव नसला तरी, ट्रम्प यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी यापूर्वी गाझा युद्धविराम आणि युक्रेन-रशिया मुद्द्यावर ट्रम्प यांना महत्वाची मदत केली होती. आता, ते इराणसोबतच्या शांतता चर्चेत अमेरिकेच्या बाजूचे नेतृत्व करत आहेत. जेरेड कुशनर ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर हे डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि इव्हांका ट्रम्प यांचे पती आहेत. त्यांनी ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळात वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केले होते आणि इस्रायल-हमास संघर्षासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर काम केले होते. आता, कुशनर पुन्हा एकदा पडद्याआड राहून ट्रम्प यांची राजनैतिकता मजबूत करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, ते आणि विटकॉफ इस्रायलच्या हिताचा विचार करून इराणसोबतच्या वाटाघाटी संयुक्तपणे पुढे नेत आहेत. Iran Israel War: मोहम्मद बागेर गालिबाफ कोण आहेत? Iran Israel War: इराणमधील एक प्रभावी आवाज मानले जाणारे मोहम्मद बागेर गालिबाफ हे इराणच्या संसदेचे (मजलिस) अध्यक्ष आहेत. ते इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे (IRGC) माजी कमांडर, तेहरानचे माजी महापौर आणि एक अत्यंत प्रभावशाली नेते आहेत. सर्वोच्च नेत्यासोबतचे त्यांचे जवळचे संबंध पाहता, ते इराणच्या वतीने कोणत्याही करारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. काही वृत्तांनुसार, विटकॉफ आणि कुशनर त्यांच्या संपर्कात आहेत, मात्र गालिबाफ यांनी स्वतः या संभाषणांचे खंडन केले आहे. सध्या काय चर्चा सुरू आहेत? वृत्तांनुसार, पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे एका बैठकीची तयारी सुरू आहे, जिथे गालिबाफ इराणचे प्रतिनिधित्व करतील अशी अपेक्षा आहे, तर अमेरिकेच्या बाजूने विटकॉफ, कुशनर आणि शक्यतो उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांचा समावेश असू शकतो. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, चर्चेत “जवळजवळ सर्व मुद्द्यांवर” एकमत होत आहे आणि काही दिवसांतच एक करार होऊ शकतो. इराणने जाहीरपणे याचे खंडन केले आहे, परंतु इस्रायली सूत्रांनी संपर्क सुरू असल्याची पुष्टी केली आहे. ट्रम्प यांचे प्रयत्न केवळ अमेरिका-इराण-इस्रायलमधील तणाव कमी करण्यावरच नव्हे, तर होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या भागांमध्ये स्थिरता आणणे आणि जागतिक बाजारपेठांना दिलासा देण्यावरही केंद्रित आहेत.