देशद्रोहाच्या आरोपाखाली आयपीएस अधिकारी निलंबित
Updated On:

अमरावती : आंध्र प्रदेश सरकारने देशद्रोहाच्या आरोपाखाली पोलिस महासंचालक दर्जाचे आयपीएस अधिकारी ए.बी वेंकटेश्वर राव यांना निलंबित केले आहे.
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री मुख्य सचिव नीलम सहनी यांनी पोलिस महासंचालक गौतम स्वंग यांच्या अहवालाच्या आधारे हे आदेश काढले. यामध्ये राव यांच्यावर सुरक्षा उपकरणांच्या खरेदी प्रक्रियेत भ्रष्टाचार’ केल्याचा आरोप आहे. हा
माजी मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांचे निकटवर्ती मानले जातात. राव यांच्यासंबंधित गोपनीय अहवाल “राव यांनी एका परराष्ट्र संरक्षण संस्थेला गुप्तचर प्रोटोकॉल आणि पोलिस प्रक्रियेविषयी माहिती दिली होती.”
वेंकटेश्वर राव 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. वाय.एस. जगनमोहन रेड्डी सरकारने गेल्या वर्षी त्यांची गुप्तचर पदावरून हकालपट्टी के;केली होती.





