बीएसएफच्या महासंचालकपदी आयपीएस दलजीत सिंग चौधरी त्यांची निवड ; जाणून घ्या बीएसएफचे नेमके काम काय?

IPS Daljit Singh Chaudhary । केंद्र सरकारकडून आयपीएस दलजित सिंह चौधरी यांची सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) प्रमुख केले आहे. दलजीत सिंह चौधरी यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९६५ रोजी झाला. ते उत्तर प्रदेश केडरचे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सिंग हे यापूर्वी सशस्त्र सीमा बलचे महासंचालक राहिले आहेत. याशिवाय त्यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष संचालक आणि अतिरिक्त महासंचालक म्हणूनही नियुक्ती करण्यात आलीय.
आयपीएस दलजितसिंग चौधरी यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर त्यांनी बीएससी आणि एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. आयपीएस अधिकारी दलजीत सिंह चौधरी यांची गणना देशातील सर्वात चपखल अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. आयपीएस चौधरी यांना आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रपती पदक मिळाले आहे. IPS चौधरी 2025 च्या अखेरीस निवृत्त होतील. उत्तर प्रदेशातही त्यांची अनेक मोठ्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस दलजीत सिंह चौधरी यांचा जन्म दिल्ली येथे झाला.
BSF DG ला किती पगार मिळतो? IPS Daljit Singh Chaudhary ।
महासंचालकांना इतर अनेक सुविधांसह 2 लाख 50 हजार रुपये पगार मिळतो. ज्यामध्ये निवास, वाहन, वैद्यकीय सुविधा, प्रवास भत्ता इ. अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की बीएसएफ संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. परंतु हे दल गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
बीएसएफचे काम काय? IPS Daljit Singh Chaudhary ।
बीएसएफचे पूर्ण नाव सीमा सुरक्षा दल आहे. हे दल भारताचे एक प्रमुख निमलष्करी दल आहे ज्याची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी झाली. भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवर बीएसएफ तैनात आहे. देशाच्या सीमेवर घुसखोरी आणि तस्करी रोखण्यासाठी बीएसएफ काम करते. याशिवाय सीमेवर शांतता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी बीएसएफची आहे. बीएसएफ भारतीय सैन्याला युद्ध किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदत करते.
हेही वाचा
ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ वक्तव्यावर दिलीप जैस्वाल यांचा पलटवार ; म्हणाले,” हा वेडेपणा..”





