#IPL2022 #LSGvMI : राहुलच्या शतकी खेळीवरून मुंबई इंडियन्सला चाहत्यांकडूनच टोमणे

मुंबई – लखनौ सुपर जायंट्सने रविवारी मुंबई इंडियन्सचा पराभव केला. हा मुंबई संघाचा यंदाच्या मोसमातील सलग आठवा पराभव ठरला. या सामन्यात लखनौचा कर्णधार लोकेश राहुल याने नाबाद शतक फटकावले होते. मात्र, आता चाहत्यांनी त्याच्याच शतकी खेळीचा आधार घेत मुंबई संघावर टीकेची झोड उठवली आहे. दुबळ्या संघाविरुद्ध शतक फटकावून काय उपयोग, अशा शब्दांत मुंबई संघावर ताशेरे ओढले गेले आहेत.
आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौने मुंबईचा पराभव केला. लखनौचा कर्णधार राहुलने नाबाद 103 धावांची खेळी केली. त्याचे हे यंदाच्या मोसमातील दुसरे शतक ठरले.
मुंबईचा प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर
विशेष म्हणजे ही दोन्ही शतके त्याने मुंबई इंडियन्स विरुद्धच ठोकली आहेत. नेटकऱ्यांनी राहुलच्या शतकी खेळीवरून मुंबई इंडियन्सला टोमणा मारला असून, दुबळ्या संघाविरुद्ध शतक करून काय फायदा, असे ताशेरे ओढले आहेत.





