#IPL2022 | सलग 6 पराभव पत्करलेल्या मुंबई इंडियन्सवर चाहत्यांची टीका
Updated On:

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात सलग सहा पराभव पत्करलेल्या मुंबई इंडियन्सला आता चाहत्यांच्या टीकेचाही सामना करावा लागत आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मावरही चाहत्यांनी आसूड ओढले आहेत.
संघाचा पराभव होत असताना संघातील कर्णधारासह अनेक खेळाडू एकमेकांची थट्टा करताना दिसले. संघ हरत असताना तुम्हाला हे कसे सुचते. पराभवानंतर निराश दिसण्याऐवजी ड्रेसिंग रुममध्ये खेळाडू विविध पदार्थांचा आस्वाद घेताना दिसले. त्यावरही टीका होत असून अशा परिस्थितीत तुम्हाला गंमत कशी सुचते, तसेच जेवण तरी कसे जाते, अशीही टीका चाहत्यांनी केली आहे.





