#IPL2020 : यंदा विजेत्याला मिळणार ‘इतके’ कोटी
Updated On:

नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेच्या विजेत्या संघाला गेल्या वर्षीपर्यंत 20 कोटी रुपये मिळत होते. यंदा मात्र, 10 कोटी रुपयांवरच समाधान मानावे लागणार आहे. बक्षीस रकमेत निम्मी कपात होणार असल्याचे बीसीसीआयने गेल्या मार्च महिन्यातच जाहीर केले होते.
यंदाच्या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या मंगळवारी होणार आहे. त्यात प्ले-ऑफमधील तसेच अंतिम फेरीत स्थान मिळवणाऱ्या संघांनाही मानधन दिले जाते.
विजेता संघ 10 कोटी रकमेचा मानकरी असेल तर, उपविजेता संघ 12.50 कोटींऐवजी यंदा 6.25 कोटी रुपये कमावेल. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघांना 4 कोटी 36 लाख रुपये मिळतील.





