#IPL2020 : दिल्लीचा चेन्नईवर शानदार विजय

दुबई : युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शाॅ याच्या शानदार अर्धशतकी आणि कगिसो रबाडा याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने चेन्नईवर ४४ धावांनी विजय मिळविला आहे. या स्पर्धेत दिल्लीचा हा सलग दुसरा विजय आहे. पृथ्वी शाॅ सामनावीर ठरला.
चेन्नईने टाॅस जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. त्यानंतर दिल्लीने सलामीवीर पृथ्वी शाॅच्या ६४(४३), शिखर धवनच्या ३५(२७), श्रेय्यस अय्यरच्या २६(२२) आणि रिषभ पंतच्या नाबाद ३७(२५) आणि मार्कस स्टोइनिसच्या नाबाद ५(३) धावांच्या जोरावर २० षटकांत ३ बाद १७५ अशी मजल मारली होती.
चेन्नईकडून गोलंदाजीत पियुष चावलाने ४ षटकात ३३ धावा देत २ आणि सॅम करनने ४ षटकात २७ धावा देत १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात विजयासाठी १७६ धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघास २० षटकांत ७ बाद १३१ धावांपर्यत मजल मारता आणि ४४ धावांनी पराभव स्विकारावा लागला. चेन्नईकडून फलंदाजीत शेन वाॅटसनने १४, मुरली विजयने १०, रूतुराज गायवकडने ५, केदार जाधवने २६(२१), डुप्लेसिसने ४३(३५), एम एस धोनीने १५(१२) आणि रवींद्र जडेजाने १२(९) धावा केल्या.
दिल्लीकडून कगिसो रबाडाने सर्वोत्कृष्ठ गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत २६ धावा देत ३ गडी बाद केले. तर एनरिज नोर्जेने ४ षटकात २१ धावा देताना २ गडी बाद केले. अक्षर पटेलने ४ षटकांत १८ धावा देत १ गडी बाद केला.





