#IPL2019 : राजस्थानसमोर केकेआरच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान

राजस्थान रॉयल्स Vs कोलकाता नाईट रायडर्स

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – सवाई मानसिंग स्टेडियम, जयपुर

जयपूर – आयपीएलच्या बाराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा पराभूत केल्याने राजस्थान रॉयल्स संघाचा आत्मविश्‍वास वाढला असून रविवारी त्यांचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी (केकेआर) होणार आहे.

घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात त्यांच्यासमोर आंद्रे रसेल, नीतीश राणा, रॉबिन उथप्पा आणि शुबमन गिल या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असणार आहे.

राजस्थानकडून श्रेयस गोपाल यशस्वी गोलंदाज ठरला असून त्याने आपल्या गुगलीने विराट कोहली, एबी डि व्हिलिअर्स आणि शिमरोन हैटमेयर यांना चकवा देत 4 षटकांत फक्‍त 12 धावांत 3 विकेट घेतल्या होत्या.तर गोलंदाज जोफ्रा आर्चर, जयदेव उनादकत आणि बेन स्ट्रोक्‍स यांनी शेवटच्या षटकांमध्ये जास्त धावा दिल्या आहेत. त्यातच बंगळूरू विरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्यात जबरदस्त पावर हिटिंगचा नमुना सादर करत आंद्रे रसेलने (13 चेंडूत नाबाद 48 धावा) केल्याने त्याला रोखण्याबाबतची रणनिती आखावी लागणार आहे.

बंगळूरू विरुद्ध विजय मिळविला असला तरी राजस्थान रॉयल संघाला त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्याची आश्‍यकता आहे. किंग्स इलेवन पंजाब, सनराइजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्याविरुद्ध चांगली स्थिती असतानाही त्यांनी सामना गमविला आहे. स्टीव स्मिथ आणि बेन स्टोक्‍स या स्टार खेळाडूंकडून आतापर्यंत साजेशी अशी कामगिरी झालेली नाही. या आयपीएलमध्ये पहिले शतक झळकाविणारा संजू सॅमसन, जोस बटलर आणि कर्णधार अजिंक्‍य रहाणे यांनी चांगली फलंदाजी केली आहे.

दुसरीकडे केकेआर सुनील नरेन, कुलदीप यादव आणि पीयूष चावला या फिरकी गोलंदाजीच्या मदतीने सवाई मान सिंह मैदानावरील खेळपट्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. या मैदानावरील खेळपट्‌टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. तसेच संघातील फलंदाज फार्मात असल्याने केकेआरचा आत्मविश्‍वास वाढला असून ते विजयाच्या इराद्यानेच मैदानात उतरणार आहेत.

प्रतिस्पर्धी संघ –

राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिर्ला, एस मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्‍स, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोढी, धवल कुलकर्णी आणि महिपाल लोमरोर, जयदेव उनाडकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लिआम लिविंगस्टोन, शुभम रांजणे, मनन वोहरा, रियान प्रयाग, एस्टन टर्नर.

कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, क्रिस लिन, आंद्रे रसेल, सुनील नारायन, शुबमन गिल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिद कृष्णा, नितेश राणा, रिंकू सिंह, कार्लोस ब्रॅथवेट, लोकी फर्ग्युसन, एनरिच नॉर्च, निखिल नाइक, हॅरी गर्नी, पृथ्वी राज यारा, जो डेनली, श्रीकांत मुंढे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.