#IPL | ऋतूराजला मिळणार चेन्नईचे नेतृत्व
Updated On:

चेन्नई – महाराष्ट्राचा क्रिकेटपटू व चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू ऋतूराज गायकवाड याच्यावर लवकरच नवी जबाबदारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याला देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील मानाची समजली जात असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व देण्यात आले आहे.
आता आयपीएल स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमासाठी देखील त्याला चेन्नई संघाच्या कर्णधारपदी नियुक्त केले जाण्याचे संकेत मिळत आहेत. कर्णधार महेंद्रसिंह धोनी चेन्नईकडूनच खेळणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरीही तो आपला उत्तराधिकारीही याच स्पर्धेत पुढे आणेल असे सांगितले जात आहे व हा उत्तराधिकारी ऋतूराजच असल्याचेही संकेत दिले जात आहेत.





