#IPL : प्रशिक्षक सायमन कॅटीचचा राजीनामा
Updated On:

बेंगळूरू – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रशिक्षक व ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू सायमन कॅटीच यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सिंगापूरचा अष्टपैलू क्रिकेटपटू टीम डेव्हिडसह श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगा आणि दुश्मंता चमीरा यांचा बंगळुरू संघात समावेश केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा ऍडम झम्पा, केन रिचर्डसन आणि न्यूझीलंडचा फिन ऍलन आणि स्कॉट कुगलाइन यांनी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली आहे.
या उर्वरित सामन्यांसाठी तयारी सुरू होत असतानाच त्यांच्या संघाचे प्रशिक्षक सायमन कटिच यांनीही वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता माइक हेसन यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.





