Virat Kohli Golden Duck against LSG IPL 2026 : आयपीएल २०२६ मधील ५० व्या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहली अवघ्या दोन चेंडूंचा सामना करून शून्यावर बाद झाला. लखनौचा युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवने विराटला क्लीन बोल्ड करत क्रिकेट विश्वाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. यासह विराट कोहलीने एका नकोशा विक्रमाला गवसनी घातली आहे. विराटचा ९ वर्षांनंतरचा नकोसा विक्रम – २१३ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला आपल्या सर्वात अनुभवी खेळाडूकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, प्रिन्स यादवच्या वेगवान चेंडूने विराटच्या आशा धुळीस मिळवल्या. प्रिन्सने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर विराटने स्विंगचा अंदाज घेतला, पण दुसऱ्याच चेंडूवर प्रिन्सने १४०.४ किमी प्रतितास वेगाने इनस्विंगर टाकला, ज्यावर विराटने पूर्णपणे चकवा खाल्ला आणि क्लीन बोल्ड झाला. 𝗣𝗿𝗶𝗻𝗰𝗲 𝗴𝗲𝘁𝘀 𝘁𝗵𝗲 𝗞𝗶𝗻𝗴 😮 \|/ 🎥 An absolute peach of a delivery from the young fast bowler to rattle the stumps 💥 Updates ▶️ https://t.co/W0eDq9aWb7#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvRCB | @LucknowIPL pic.twitter.com/YlxbQO9Oma — IndianPremierLeague (@IPL) May 7, 2026 विशेष म्हणजे, २०१७ नंतर पहिल्यांदाच विराट कोहली आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना ‘शून्यावर’ बाद झाला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध तो धावांचा पाठलाग करताना शून्यावर बाद झाला होता. तसेच, २०२३ च्या हंगामानंतर पहिल्यांदाच विराटने डक (०) झाला असून, त्याने सलग ४६ डाव शून्यावर बाद न होता खेळण्याचा पराक्रम केला होता, जो आता खंडित झाला आहे. हेही वाचा – Hardik Pandya Return : मुंबई इंडियन्सच्या गोटात मोठी हालचाल! हार्दिक पंड्या संघात परतला; पण १० मेच्या सामन्याबाबत सस्पेन्स कायम लखनौविरुद्ध कोहलीचा दुसऱ्यांदा डक – विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीतील ही ११ वी ‘डक’ ठरली आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळताना विराट दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. लखनौच्या संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा केला होता, मात्र आरसीबीची सुरुवात अत्यंत खराब झाली. मोहम्मद शमीने पहिल्या ओव्हरमध्ये जॅकब बेथेलला बाद केल्यानंतर, प्रिन्स यादवने विराटला बाद करून आरसीबीला मोठा धक्का दिला. विराटच्या या अनपेक्षित एक्झिटमुळे आरसीबीचे चाहते पूर्णपणे शांत झाले असून, लखनौच्या गोटात मात्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.