राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत १० सामने खेळले असून ६ विजय आणि ४ पराभवांसह १२ गुण मिळवले आहेत. ते सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सनेही १० सामन्यांत ६ विजय मिळवून १२ गुणांची कमाई केली आहे, परंतु रनरेटमुळे ते पाचव्या क्रमांकावर आहेत. आजचा विजय दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
\n\n\nINDIAN PREMIER LEAGUE 2026
\n52ND MATCH
\n
\nRAJASTHAN ROYALS VS GUJARAT TITANSGET 100% GUARANTEED MATCH REPORTS#predict88 #matchreport #matchprediction pic.twitter.com/fZjKCXDdKG
\n— Predict88 (@Predict88cricke) May 8, 2026
\nहेड-टू-हेड रेकॉर्डचा विचार केला तर गुजरात टायटन्सचे पारडे जड वाटते. उभय संघांत आतापर्यंत ९ सामने झाले असून गुजरातने ६ तर राजस्थानने केवळ ३ सामने जिंकले आहेत. जयपूरच्या मैदानावरही गुजरातने ३ पैकी २ सामन्यांत बाजी मारली आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सच पारडे जड वाटतं असलं, तरी राजस्थानचा सध्याचा फॉर्म पाहता ते वर्चस्व गाजवतील असं दिसतंय.
\n\n“Shubman Gill” arriving in Jaipur for RR vs GT Match 💥✨#ShubmanGill #GujaratTitans #RajasthanRoyals #RRvsGT #IPL pic.twitter.com/qBs7HFG2BG
\n— SpotLight Mediaz (@SpotLightMediaz) May 7, 2026
\nआजच्या सामन्यात राजस्थानचा १५ वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि गुजरातचा कर्णधार शुबमन गिल यांच्यातील जुगलबंदी पाहण्यासारखी असेल. वैभवने या हंगामात ४०० हून अधिक धावा कुटल्या असून तो सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे गिलनेही आपल्या फलंदाजीने सातत्य राखले आहे. या दोन फलंदाजांची कामगिरीच आजच्या सामन्याचा निकाल ठरवू शकते.